शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

गोर्डेंनी ऐनवेळी राष्ट्रवादीची मिळवलेली उमेदवारी; सेनेच्या भुमरेंना पडणार भारी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 16:47 IST

राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संजय वाघचौरे नाराज असून, ते गोर्डे यांच्या प्रचारापासून लांब असल्याचे दिसत आहे.

मुंबई - राजकरणात कधी काय होईल यांचा अंदाज नसतो. असेच काही पैठण विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. कधीकाळी कट्टर शिवसैनिक असलेले आणि त्यांनतर भाजपमध्ये गेलेले दत्ता गोर्डे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवत, राजकीय गुरूलाच आव्हान देत मैदानात उतरले आहे. त्यामुळे पैठण मतदारसंघातील लढत चर्चेचा विषय ठरत आहे.

गेल्यावेळी आमदार भुमरे पैठणमधून चौथ्यांदा ( २००९ सोडून ) आमदार म्हणून निवडून आले. मात्र भुमरेंच्या राजकीय तालमीतील मल्ल समजले जाणारे दत्ता गोर्डेचं आता त्यांच्या विरोधात रिंगणात उतरले आहे. गोर्डे हे भाजपमध्ये असताना सुद्धा या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडली नव्हती. तर भुमरेंच्या विरोधात कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणारचं अशी भूमिका गोर्डे यांनी यावेळी घेतली होती.त्यामुळे ऐनवेळी गोर्डे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवत, भूमरेंच्या विरोधात दंड थोपटले. तर या दोन्ही नेत्यांनी मतदारसंघात सभा व बैठकीचा धडाकाच लावला असून, संदीपान भुमरे व दत्ता गोर्डे यांच्यातचं खरी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुरु-शिष्याच्या लढाईत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संजय वाघचौरे नाराज असून, ते गोर्डे यांच्या प्रचारापासून लांब असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तर शिवसेनेचे भुमरेंसाठी भाजपचे नेते प्रचारात उतरले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे काँग्रेसचे नेते सुद्धा गोर्डेंचा प्रचार करतांना दिसत आहे. त्यामुळे पैठणमध्ये शिवसेना पुन्हा गड राखणार की परिवर्तन होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

जातीय समीकरणे ठरणार महत्वाचे

वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण रिंगणात असून, दलित समाजातील मतदार बरोबरच बंजारा समाजातील मते त्यांच्या बाजूने पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे सहाजिकच याचा फटका भुमरे यांना बसू शकतो. तर राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहणारा मुस्लीम समाज एमआयएमसोबत जाण्याची शक्यता असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. त्यामुळे यावेळी पैठण विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीत जातीय समीकरणे महत्वाचे ठरणार असल्याचे पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.