शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : बाळासाहेबांची अटक अन् अजित दादांचं स्टेटमेंट, शरद पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 17:57 IST

Maharashtra Assembly Election 2019 : बाळासाहेबांच्या अटकेसंदर्भातील अजित पवार यांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बाळासाहेबांना त्याकाळी अटक करण्यात आलेल्या कृत्यावर मोठा खुलासा केला होता. वरिष्ठांच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक करण्यात आल्यांचं अजित पवारांनी सांगितलं होतं. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, पवारांनी उत्तर देण्याचं टाळलं. तसेच, तो आजचा प्रश्न नसून आजचे प्रश्न वेगळेच असल्याचे पवारांनी म्हटले. 

शरद पवार यांची बीबीसी न्यूज पोर्टलसाठी मुलाखत घेण्यात आली. त्यामध्ये, बाळासाहेबांच्या अटकेसंदर्भातील अजित पवार यांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, तो आजचा प्रश्न नाही, असे पवार यांनी म्हटले. ''ज्या गोष्टी झाल्या त्या काढायच्या कशासाठी? बाळासाहेब आज हयात नाहीत. माझ्यामते ते प्रश्न आजचे प्रश्न नाहीत. आजचा प्रश्न बेकारी आहे, आजचा प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे. आजचे प्रश्न यापेक्षा अधिक गंभीर आहेत. या प्रश्नांना डायव्हर्ड करण्याचं काम सरकार करत असून मीडियाही त्याला बळी पडत आहे. बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रश्न आमच्यापुढे नाही. आज महाराष्ट्राला तो प्रश्न गरजेचा नाही'', असे उत्तर शरद पवार यांनी दिलंय. 

दरम्यान, अजित पवारांचा हा इशारा छगन भुजबळांवर होता का, असा प्रश्न भुजबळ यांना विचारण्यात आला होता. त्यावर, माझा नाईलाज होता, म्हणून मी त्या फाईलवर सही केली, असे भुजबळांनी सांगितलं होतं. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019