शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: 'कर्जमाफीचं विचारताच, मुख्यमंत्र्यांकडून 'भारत माता की जय'च्या घोषणा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 15:02 IST

कलम ३७० हटवले चांगले केलं, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. त्याबद्दल कोणत्या पक्षाने काय केलं

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्यात आला असून, राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. फडणवीस यांच्या सभेत शेतकरी कर्जमाफी बद्दल विचारत असताना, मुख्यमंत्री मात्र भारत माता की जय, अशा घोषणा देत असल्याच्या आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. मूर्तिजापूर येथील सभेत ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच मतदारसंघात राजकीय नेत्यांच्या सभा होताना पहायला मिळत आहे. तर याच सभामधून सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करत असल्याचे पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांनी गुरुवारी मूर्तिजापूर येथील सभेत बोलताना भाजप सरकारवर टीका करतांना मुख्यमंत्री फडणवीस यांचा समाचार घेतला.

मुख्यमंत्र्यांच्या सभेत एका शेतकऱ्याने उभा राहून कर्जमाफी झाली नाही म्हणून प्रश्न विचारला. मात्र मुख्यमंत्री त्याचे आयकत नव्हते, तर फक्त 'भारत माता की जय - भारत माता की जय' अशा घोषणा देत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला. भारत माता तुमची मात्र मलिदा यांचा असा खोचक टोला सुद्धा यावेळी बच्चू कडूंनी फडणवीस यांना लगावला.

कलम ३७० हटवले चांगले केलं, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. त्याबद्दल कोणत्या पक्षाने काय केलं असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर राज्यातील निवडणुका शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाल्या पाहिजेत. मात्र तसे होत नसून, निवडणुकीत कलम ३७० च्या मुद्दा पुढे केला जात असल्याचे बच्चू कडू म्हणाले.