शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
2
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
3
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
4
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
5
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
6
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
7
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा!
8
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
9
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
10
"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
11
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
12
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
13
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
14
'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले
15
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
16
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
17
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
18
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
19
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 
20
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला

महागड्या एचएसआरपी नंबर प्लेटबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान, म्हणाले, महाराष्ट्रात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:44 IST

CM Devendra Fadnavis on HSRP Price: सर्व स्वयंचलित वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या एचएसआरपी नंबरप्लेटच्या किमती इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एचएसआरपी नंबर प्लेटच्या दरांबाबतची आकडेवारी सभागृहात मांडली. तसेच महाराष्ट्रामध्ये एचएसआरपी नंबर प्लेटचे दर वाजवी असल्याचे सांगितले.

सर्व स्वयंचलित वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या एचएसआरपी नंबरप्लेटच्या किमती इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करताना एचएसआरपी  नंबर प्लेटच्या दरांबाबतची आकडेवारी सभागृहात मांडली. तसेच महाराष्ट्रामध्ये एचएसआरपी नंबर प्लेटचे दर वाजवी असल्याचे सांगितले.

देशात सर्वात महाग एचएसआरपी नंबरप्लेट महाराष्ट्रात विकल्या जात आहेत, असा एचएसआरपी नंबरप्लेटबाबत एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला. खरंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे याची अंमलबजावणी आपल्याला आधीच करायची होती. दरम्यान, या एचएसआरपी नंबरप्लेटच्या अंमलबजावणीबाबत आपण मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. त्यांनी इतर सदस्यांसोबत मिळून या नंबर प्लेटबाबत जे काही दर आले होते. त्याचं मूल्यमापन करून अंतिम दर निश्चित केले आहेत.

यासंदर्भात आपण पाहिलं तर काही राज्यांनी फिटमेंट चार्जेस आणि प्लेट चार्जेसहे वेगवेगळे दाखवले आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण हे सर्व एकत्र केलं आहे.  विविध राज्यांतील दुचाकींसाठीच्या एचएसआरपी नंबर प्लेटचे दर पाहिते तर ते ४२० ते ४८० दरम्यान आहेत. महाराष्ट्रामध्ये हे दर ४५० रुपये आहेत. तर तीन चाकींसाठी सर्व राज्यांमध्ये ४५० ते ५५० रुपये दर आहे, तर महाराष्ट्रामध्ये हेच दर ५०० रुपये आहेत. चारचाकींसाठी सरासरी ८०० रुपये दर आहे. तर महाराष्ट्रामध्ये ते ७५० रुपये आहेत. जड वाहनांसाठी ६९० ते ८०० तर आपल्याकडे हा दर ७४५ रुपये आहे. पुरावा म्हणून मी मुद्दाम इतर राज्यांमधील पावत्या घेऊन आलो आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीसांनी एचएसआरपी नंबर प्लेटबाबत करण्यात येत असलेले दावे फेटाळून लावले आहेत.

देवेंद्र फडवणीस पुढे म्हणाले की, आता आपण एचएसआरपी नंबर प्लेटबाबत आपण गोव्याचा विचार केला तर त्यांनी मूळ किंमत ३१५ रुपये, फिटमेंट किंमत १०० रुपये, कन्व्हेयन्स फी ५० रुपये, जीएसटी ८३ रुपये, असं केलं तर त्यांची किंमत ५४८ रुपये एवढी होते. चंडीगडचीही जवळपास ५४९ रुपये एवढी किंमत होते. तर महाराष्ट्राची एकूण किंमत पाहिली तर ती ५३१ रुपये एवढी होते. त्यामुळे महाराष्ट्रात एचएसआरपी नंबरप्लेटसाठी अवाजवी किंमत आकारली जात आहे, असं नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीनिशी सभागृहाच्या निदर्शनास आणले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन