शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
4
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
5
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
6
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
7
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
8
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
9
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
10
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
11
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
12
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
13
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
14
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
15
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
16
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
17
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
18
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
19
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
20
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर

धोका वाढला! महाराष्ट्रात पहिल्यांदाच ३१,८५५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; मुंबईत ५ हजारांवर नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 21:22 IST

कोरोनाची महासाथ सुरू झाल्यापासून पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद

ठळक मुद्देकोरोनाची महासाथ सुरू झाल्यापासून पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंदकेवळ मुंबईत ५ हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पहिल्यांदाच राज्यात सर्वाधिक म्हणजेच ३१ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे केवळ मुंबईत ५ हजारांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. मंगळवारी राज्यात २८ हजार ६९९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर सोमवारी राज्यात २४ हजार ६४५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. गेल्या चोवीस तासांत राज्यात ३१ हजार ८५५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ९५ रुग्णांच्य़ा मृत्यूची नोंद करण्यात आली. तर गेल्या २४ तासांमद्ये १५ हजार ०९८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत २५ लाख ६४ हजार ८८१ लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी २२ लाख ६२ हजार ५९३ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे ५३ हजार ६८४ रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यात एकूण २ लाख ४७ हजार २९९ अॅक्टिव्ह केसेस आहेत.कोरोना महासाथीपासून पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात रुग्णवाढगेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईत ५ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, ही सर्वाधिक रुग्णवाढ असून कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे. सध्या मुंबई एकून ३० हजार ७६० अॅक्टिव्ह केसेस असून रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के इतका आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत २ हजार ०८८ रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं असून रुग्ण दुपटीचा कालावधी ८४ दिवस असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका