शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

Maharashtra: 5,460 जोडप्यांना मिळणार 27 कोटी

By नितीन चौधरी | Updated: June 30, 2023 09:47 IST

Marriage: समाजातील जातीव्यवस्था नष्ट व्हावी, तसेच अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसाहाय्य देण्यात येते.

- नितीन चौधरी / समीर देशपांडे पुणे/कोल्हापूर : समाजातील जातीव्यवस्था नष्ट व्हावी, तसेच अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसाहाय्य देण्यात येते. त्यानुसार या आर्थिक वर्षात राज्यासाठी २७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे सुमारे साडेपाच हजार जोडप्यांना आर्थिक फायदा होणार आहे. 

कुणाला मिळते रक्कम? n ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य या योजनेंतर्गत प्रत्येक दाम्पत्याला देण्यात येते. ही रक्कम पती-पत्नी यांच्या संयुक्त नावाने देण्यात येते. n मंजूर झालेला निधी जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना उपलब्ध करून दिला आहे.

कोणासाठी ही योजना? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत जैन व शीख या प्रवर्गात असणे आवश्यक आहे.

विभागनिहाय मिळालेला निधीजूनमध्ये एकूण मंजूर निधी ₹२७,३१,७६,०००मुंबई    ₹४.३९ कोटीपुणे    ₹५.३३ कोटीनाशिक     ₹५.७९ कोटीअमरावती    ₹३.८६ कोटीनागपूर    ₹६.५२ कोटी औरंगाबाद    ₹६४.५ लाख लातूर    ₹७६.८ लाख

आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांच्या संसाराला हातभार लागावा, या उद्देशाने अनुदान मंजूर करण्यात येते. हा निधी या दाम्पत्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे.  - डॉ. प्रशांत नारनवरे,  आयुक्त, समाज कल्याण

छत्रपती संभाजीनगर विभागातून सर्वांत कमी प्रस्तावसर्वाधिक म्हणजे २,७२३ आंतरजातीय विवाह अनुदान प्रस्ताव नागपूर विभागातून आले आहेत. तर सर्वांत कमी म्हणजे २७१ छत्रपती संभाजीनगर विभागातून आले आहेत. सर्वांत जास्त म्हणजे १,१७२ प्रस्ताव जळगाव जिल्ह्यातून तर सर्वांत कमी म्हणजे २० प्रस्ताव जालना जिल्ह्यातील आहेत.

आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांची संख्याजळगाव    १,१७२पुणे    ७९५नागपूर    ७७०अमरावती    ६९०नाशिक    ६०२चंद्रपूर    ६००भंडारा    ४५३मुंबई उपनगर    ४५३रायगड    ४२२सातारा    ४१८गोंदिया    ४०६कोल्हापूर    ४००सोलापूर    ३५५यवतमाळ    ३५३ठाणे    ३०६अकोला    २९२गडचिरोली    २७८सांगली    २६०पालघर    २४३वर्धा    २१६बुलढाणा    २००मुंबई शहर    १८५धुळे    १३८रत्नागिरी    ९५सिंधुदुर्ग    ८१नंदुरबार    ७८वाशिम    ७४लातूर    ७२धाराशिव    ७०बीड    ६९हिंगोली    ३९परभणी    २२जालना    २०

टॅग्स :marriageलग्नMaharashtraमहाराष्ट्र