शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

खोपोलीत जाळला माधव भंडारींचा पुतळा

By admin | Updated: June 29, 2016 02:29 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत आपत्तीजनक विधान केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत.

वावोशी : भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत आपत्तीजनक विधान केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत. खोपोलीतही मंगळवारी दुपारी दीपक चौकात शिवसैनिकांकडून माधव भंडारी यांचा पुतळा जाळण्यात आला.राज्यात व केंद्रात शिवसेना- भाजपा सरकार एकत्र चालवत असले तरी या दोन पक्षांत सध्या भडका उडालेला दिसत आहे. शिवसेना पक्षाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्र मात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका व नगरपालिका निवडणुकीसाठी वेडीवाकडी युती करणार नाही असे नाव न घेता भाजपाला टोला लगावला होता. त्यानंतर भाजपाकडून अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. मात्र भाजपाचे काही नेते, प्रवक्ते मात्र सेना व उद्धव ठाकरेंबाबत काही तरी बोलताना दिसत होते. या दोन्ही पक्षांत आरोप-प्रत्यारोपाची मालिकाच सुरू झाली व नुकतीच भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना शोले पिक्चरमधील असरानीशी केल्यानंतर शिवसैनिक भडकले आणि महाराष्ट्रात तांडव सुरू झाले. पुणे, मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये शिवसैनिकांकडून माधव भंडारी यांचा निषेध वेगवेगळ्या मार्गाने सुरू झाला.खोपोलीत मंगळवारीही शिवसैनिकांनी कोणालाही कल्पना न देता माधव भंडारी यांचा पुतळा जाळत निषेध नोंदवला. काही शिवसैनिक शहराच्या दीपक चौकात जमले आणि त्यांनी माधव भंडारी यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. यावेळी अचानक झालेल्या या आंदोलनाची माहिती पोलिसांना आयत्यावेळी लागली. दीपक चौकात पोलीस पोहचले व त्यांनी भंडारींचा पुतळा विझवण्याचा प्रयत्न केला व शिवसैनिकांची धरपकड केली. या आंदोलनासाठी परवानगी न घेतल्याने शहर संपर्क प्रमुख विवेक पाटील, गटप्रमुख अनिल सानप, अनिल शेलार, नितीन मोरे, वसंत जोशी, बाळासाहेब धामणकर यांना पोलिसांनी अटक केली व गुन्हा नोंदवण्यात आला. (वार्ताहर)