शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

बोल की लब आझाद है तेरे...

By admin | Updated: November 24, 2015 03:06 IST

बोल की लब आजाद हैं तेरे, बोल जबाँ अब तकतेरी है... शायर फैैज अहमद फैैज यांची कविता सादर करीत शबाना आझमी यांनी साहित्यिक, कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला साद दिली.

पुणे : बोल की लब आजाद हैं तेरे, बोल जबाँ अब तकतेरी है... शायर फैैज अहमद फैैज यांची कविता सादर करीत शबाना आझमी यांनी साहित्यिक, कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला साद दिली. निमित्त होते, लोकमत माध्यम समूहाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मोहर ग्रुप प्रस्तुत लोकमत साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्याचे. पुण्यातील मान्यवर साहित्यरसिकांच्या उदंड प्रतिसादात हा सोहळा रंगला. या वेळी सन्माननीय अतिथी म्हणून शबाना आझमी बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे, नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक अजय अंबेकर, मोहर ग्रुपचे अध्यक्ष व घुमानमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, लोकमतचे संपादक विजय बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. 

याशिवाय अवघ्या देशाला आपल्या तालासुरांनी नाचायला लावणारे प्रख्यात संगीतकार अजय-अतुल गोगावले यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत माध्यम समुहाचे अध्यक्ष विजय दर्डा होते.
लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक, संशोधक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. रा. चिं. ढेरे यांना ‘लोकमत जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहू न शकल्याने त्यांच्या वतीने त्यांची कन्या वर्षा गजेंद्रगडकर व मुलगा मिलिंद ढेरे यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार वितरण्याच्या आदल्या दिवशी लोकमत समूहाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांनी रा. चिं. ढेरे यांच्या घरी जाऊन त्यांची सदीच्छा भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. १ लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. कथा विभागात सतीश तांबे, कादंबरी विभागात नामदेव माळी, कविता विभागात श्रीधर नांदेडकर, ललित गद्य विभागात अतुल धामनकर, ललितेतर गद्य विभागात एम. डी. रामटेके, चरित्र-आत्मचरित्र विभागात अरविंद जोग, वैचारिक समीक्षा विभागात प्रा. प्रकाश पवार, अनुवाद विभागात धनश्री हळबे, विज्ञान विभागात पाणी विषय केंद्रस्थानी धरून देशोदेशीचे पाणी व इतर चार पुस्तके याबद्दल मुकुंद धाराशिवकर यांना प्रत्येकी २५ हजार, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठासाठी चित्रकार सतीश भावसार यांना ११ हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.
-------------
देवळासारखं घर
डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या घरी त्यांच्या आशीर्वाद घेण्यास गेलो तो दिवस माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. घरातलं वातावरण पाहिल्यानंतर मला एखाद्या देवळात गेल्यासारखे वाटले. अण्णांच्या जवळ मी त्यांच्या सौभाग्यवतींना बसवलं व त्यांचा हात अण्णांच्या हातावर ठेवला. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर जे स्मित उमललं ती माझ्यासाठी सुंदर आठवण ठरली आहे, असे खासदार विजय दर्डा यांनी यावेळी सांगितले.

हा सर्जनाचा, विचारांचा उत्सव - विजय दर्डाखासदार विजय दर्डा म्हणाले, लोकमत साहित्य पुरस्कार हा सर्जनाचा, विचारांचा उत्सव आहे. विविध क्षेत्रांत जे जे उत्तम आहे ते ते वाढावे अशी लोकमतची भूमिका आहे. त्या पार्श्वभूमीवर हे लोकमतचे पुरस्कार वितरणाचे तिसरे पर्व आहे. पुरस्कार वापसीच्या दिवसांत हे लोकमतचे पुरस्कार दिले जात आहेत. परंतु पारदर्शक पद्धतीने हे पुरस्कार दिले जात असल्याने ते कुणीही परत करणार नाही. या साहित्य पुरस्कारांच्या माध्यमातून मराठीला नवी दिशा मिळेल असा विश्वास मला वाटतो.