शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गीतकार फडणवीस; रामानंतर शंकरावर गाणे; गायक शंकर महादेवन, अमृता फडणवीस यांनी केले गायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 10:54 IST

मध्यंतरी त्यांनी प्रभू श्रीरामाचा महिमा सांगणारे भजन रचले. आता भगवान शंकराचे गुणगान करणारे त्यांचे गीत श्रोत्यांच्या भेटीला आले आहे. 

मुंबई : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पाचवेळा आमदार, त्याआधी महापौर अशी दीर्घ राजकीय कारकिर्द लाभलेले देवेंद्र फडणवीस हे आता गीतकारही झाले आहेत. मध्यंतरी त्यांनी प्रभू श्रीरामाचा महिमा सांगणारे भजन रचले. आता भगवान शंकराचे गुणगान करणारे त्यांचे गीत श्रोत्यांच्या भेटीला आले आहे. अब जब विराजे राम लला तो राम राज ही लाएंगेराम ही मन मे राम ही तन मे रोम रोम मे राम हैराम ही स्वर है राम ही धुन है ध्वनि अब तो राम हैहे गीत फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी गायले आणि अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे. सोशल मीडियात ते लोकप्रिय झाले आहे. एक बँकर असलेल्या अमृता या गायिकादेखील आहेत आणि त्यांच्या गाण्यांचे बरेच अल्बमही निघालेले आहेत.आता भगवान शंकरावर फडणवीस यांनी लिहिलेले गीत सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि अमृता फडणवीस यांनी गायले आहे. त्याच्या काही ओळी आहेत - देवाधि देव महादेवदेवाधि देव तू तो सांब सदाशिवतू तो कण कण मे जीव तू तो धरती की नीव तू तो देवाधि देव... महाशिवरात्रीनिमित्त हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऐकले गेले.

मित्रासाठी केले होते मॉडेलिंग फडणवीस नागपुरात आमदार असताना त्यांनी मित्राच्या कपड्यांच्या दुकानाच्या जाहिरातीसाठी मॉडेलिंग केले होते. त्याचे होर्डिंग शहरात काही ठिकाणी लावण्यात आले होते व तो तेव्हा चर्चेचा विषय झाला होता. त्यावेळी त्यांचे फोटोशूट नागपूरचे प्रसिद्ध छायाचित्रकार विवेक रानडे यांनी केले होते.

होय मी मराठी...मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवनात 'कुसुमाग्रजांचा साहित्य जागर' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्येकाने एक स्वरचित कविता सादर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

त्यावेळी व्यासपीठावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कविता स्वतः शब्दबद्ध केली आणि ती आपल्या भाषणाच्या शेवटी सादर केली.शब्द खजिना जरी रिती झोळी मराठीला समर्पित माझ्या ओळी आपले नाते जशा रेशीम गाठी गर्वाने म्हणू या... होय मी मराठी, होय मी मराठी... 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmruta Fadnavisअमृता फडणवीस