शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

‘लक्झरी’ शिवशाही होणार ‘सेमी-लक्झरी’, प्रवासी मिळवण्यासाठी लढवली शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 05:28 IST

परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेली शिवशाही एसटीच्या ताμयात टप्प्याटप्प्याने दाखल होत आहे. मात्र आरामदायी आणि वातानुकूलित असलेल्या एसटीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.

- महेश चेमटे  मुंबई  -  परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेली शिवशाही एसटीच्या ताμयात टप्प्याटप्प्याने दाखल होत आहे. मात्र आरामदायी आणि वातानुकूलित असलेल्या एसटीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. परिणामी प्रवासीसंख्या वाढविण्यासाठी महामंडळाने नवी शक्कल लढवली आहे. त्यानुसार वातानुकूलित असलेली शिवशाही सेमी-लक्झरीप्रमाणे चालविण्याचेआदेश दिले आहेत. राज्यातील सर्व विभागांना ‘महत्त्वाचे’ या मथळ्याखाली परिपत्रकातून तसे आदेशच देण्यात आले आहेत.एसटी महामंडळात मार्च अखेर तब्बल दोन हजार शिवशाही एसटी दाखल होणार आहेत. यापैकी १ हजार ५०० बस या भाडेतत्त्वावर असून ५०० बस महामंडळाच्या मालकीच्या असतील. सद्य:स्थितीत राज्यभरातील ११५ मार्गांपेक्षा जास्त मार्गांवर शिवशाही धावत आहेत.एसटी ताμयात सध्या ३००पेक्षा जास्त स्वमालकीच्या आणि १५०पेक्षा जास्त बस भाडेतत्त्वावरील शिवशाही धावत आहेत. मात्र बहुतांशी मार्गांवर शिवशाहीसाठी प्रवासीसंख्या रोडावल्याचे वरिष्ठ अधिकाºयांचे म्हणणे आहे. वाजतगाजत शिवशाही एसटीच्या ताμयात दाखल झाली असली तरी मर्यादित थांबे असल्यामुळे शिवशाहीकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. परिणामी प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी आता निम आराम सेवेप्रमाणे ही सेवा चालविण्याचे आदेश महामंडळाने राज्यातील सर्व विभागांना दिले आहेत. २१ मार्चपासून राज्यातील सर्व शिवशाही बस या निम-आराम सेवेप्रमाणे सुधारित वेळेनुसार चालविण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. तसेच संबंधित चालक आणि वाहकांनादेखील ड्युटी देण्यात यावी, असे आदेशही देण्यात आले आहेत....अधिक खर्च होण्याची भीती♦सध्या मर्यादित थांबे असूनदेखील शिवशाही बसबाबत उत्पन्न कमीआणि खर्च अधिक असल्याचे वास्तव माहिती अधिकारातून उजेडातआले आहे. २०१७च्या सहा महिन्यांतच वातानुकूलित बसच्या इंधनावर१० कोटी ४९ लाख ६ हजार २१५ रुपये खर्च करण्यात आला आहे.♦तर खासगी बसला करारापोटी ६ कोटी २४ लाख ७७ हजार रुपयेदेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या सहा महिन्यांतील बसचे उत्पन्नकेवळ १४ कोटी ६९ लाख २५ हजार रुपये आहे. त्यामुळे लक्झरीप्रकारातील शिवशाही सेमी-लक्झरीप्रमाणे चालविल्यास साहजिकचइंधनावर आणि देखभालीवर अधिक खर्च होईल, अशी भीती एसटीमहामंडळातील वरिष्ठ अधिकारी खासगीत व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportराज्य परीवहन महामंडळ