शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

जिजाऊच्या लेकीला सुवर्णपदकाचा बहूमान

By admin | Updated: September 24, 2016 03:35 IST

मातृतीर्थ मतदारसंघातील देऊळगावमही येथील अत्यंत गरीब निठवे कुटुंबातील हर्षदाने आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळून दिले.

अशरफ पटेलदेऊळगावराजा, दि. २२ : मातृतीर्थ मतदारसंघातील देऊळगावमही येथील अत्यंत गरीब निठवे कुटुंबातील हर्षदाने आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळून दिले. हर्षदा निठवेने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात यशस्विनी देवसाल आणि मलायका गोएलसोबत सर्वणपदकाची कमाई केली. मॉ जिजाऊच्या लेकीला सुवर्ण पदाचा बहुमान मिळाल्यामुळे जिजाऊच्या नगरीचे नाव संपूर्ण भारतात झाल्यामुळे सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येतआहे.

देउळगाव मही येथील रहिवासी असलेले संदानंद अप्पा व त्यांची पत्नी श्रद्धा निठवे यांनी ११ वर्षांपुर्वी उहरनिर्वाह आणि मुला मुलीच्या शिक्षाणासाठी, औरंगाबाद गाठले व मेस सुरू केली. शिक्षणासाठी आलेल्या असंख्य विद्यार्थ्यांना अगदी अल्पशा दरात जेवनाचे डब्बे उपलब्ध करुन दिले. सध्या ते खानावळीचा व्यवसाय करीत आहेत. या छोट्याशा मिळकतीतून ते संसाराचा गाढा ओढतात. त्यांनी हर्षदाला क्रीडा क्षेत्रात भरारी घेण्यास प्रोत्साहीत केले. हर्षदा निठवे हिने जिद्दीच्या बळावर आजपर्यंत शुटींगपिस्तूलमध्ये ५५ पदक प्राप्त केले आहे. तिने तेजस्वनी मुळे, गंगा नारंग, अभिनव बिंद्रा, तेजस्वनी निसावंत, अंजली भागवत यांच्याकडून प्रेरणा घेवून पिस्टुलमध्ये भारतात युवा संघामध्ये प्रथम क्रमांकावर स्थान मिळविले आहे.

तसेच महिला गटात १२ वे स्थान प्राप्त केले आहे. हर्षदा ७ व्या वर्गापासून शुटिंग एअर पिस्टुलची ट्रेनिग संग्राम देशमुख यांच्याकडून घेत आहे. ८ वी आशीया स्पर्धा नवी दिल्ली येथे झालेल्या शुटींग स्पर्धेत भारताला कांस्य पदक आणि सांघिक गटात सुवर्ण पदक तसेच कुवेत येथे १३ वी सांघिक खेळात तीन सुवर्ण पदक मिळवित ६ क्रमांक पटकाविला. अझरबैजान येथे हर्षदाने सांघिक गटाच्या अंतिम फेरीत ११२२ गुणांची कमाई करीत सुवर्ण पदकाचा बहूमान प्राप्त केला. या स्पर्धेत हर्षदा महाराष्ट्र युवा संघाचा नेतृत्व करीत आहे. तसेच संग्राम देशमुख यांच्या मागदर्शनाखाली औरंगाबाद  येथील एमजीएममध्ये अद्यावत शुटींग रेंजचा सराव करीत आहे. तसेच एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांनी हर्षदा यांच्या सरावासाठी निशुल्क व्यवस्था करुनदिली.

संदानंद अप्पा यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि शुटींगमध्ये उज्वल भविष्य घडविण्याकरिता अत्यंत गरीब परिस्थितीतही तिला लागणारे साहित्य पुरविले.