शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कमी पटसंख्येच्या शाळांची झाली ‘आनंदी’ समूह शाळा; पहिला प्रयोग नंदुरबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 06:35 IST

आसपासच्या गावांतील अशा शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा (क्लस्टर) सुरू करण्याची योजना समग्र शिक्षा अभियानांतर्गत आखली आहे. 

- मनोज मोघे

मुंबई : राज्यात १७ हजार ६०० शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी, एक किंवा दोन शिक्षक असल्याने या शाळांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. आसपासच्या गावांतील अशा शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा (क्लस्टर) सुरू करण्याची योजना समग्र शिक्षा अभियानांतर्गत आखली आहे. 

याचा पहिला प्रयोग पुण्यातील पानशेत आणि नंदुरबारमधील तोरणमलमध्ये शिक्षण विभागाकडून राबविण्यात आला आहे. यामुळे आसपासच्या १० ते १२ गावांतील शाळा एकाच ठिकाणी भरत आहेत.  

समूह शाळेतील सुविधासमूह शाळांत चांगल्या सुविधा आणि शिक्षक असल्याने विद्यार्थीही आनंदाने शिक्षण घेतात, असे शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी सांगितले. पानशेतमधील समूह शाळेत १० किमी परिसरातील विद्यार्थी येतात. असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे म्हणाले.

सर्वेक्षणातून अखेर गुरुजींची सुटका

-  राज्यातील १५ ते ३५ वयोगटातील निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याच्या अशैक्षणिक कामातून राज्यातील शिक्षकांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात होणारे नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याचे काम आता शिक्षकांऐवजी स्वयंसेवी संस्थांवर सोपविण्यात आले आहे. - अशैक्षणिक कामास जुंपल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट होती. त्यामुळे शिक्षण क्रांती संघटना तसेच इतर संघटनांनी शिक्षकांना या कामातून मुक्त करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर योजना शिक्षण संचालकांनी निर्णय घेतला आहे. योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत.

स्वयंसेवी संस्थांवर जबाबदारी सोपविणारनिरक्षर सर्वेक्षण मोहिमेत जनगणना २०११ नुसार गावनिहाय निरक्षरांची संख्या तब्बल १ कोटी ६३ लाख इतकी आहे. या निरक्षर व्यक्तींना मार्च २०२७ अखेरपर्यंत साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे.  या सर्वेक्षणासाठी विविध घटकांनी स्वयंसेवी पद्धतीने ऑनलाइन नोंदणीद्वारे सहभाग घेणे अपेक्षित आहे.

अशी स्थिती

१७,६००शाळा या एक किंवा दोन शिक्षकी आहेत.२० पेक्षा कमी विद्यार्थी यात शिक्षण घेत आहेत. ७,०००शाळांत पाचपेक्षा कमी विद्यार्थी. ५,०००शाळांत १० पेक्षा कमी विद्यार्थी.  

काही शाळांत तर एक किंवा दोनच विद्यार्थी आहेत.

टॅग्स :Schoolशाळा