शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीची कैचीने निर्घृण हत्या

By admin | Updated: June 17, 2016 02:38 IST

किरकोळ वादातून प्रियकरानेच प्रेयसीची कैचीच्या सहाय्याने निर्घृण हत्या केल्याची घटना बुधवारी कुर्ला येथे घडली. याप्रकरणी वी.बी नगर पोलिसांनी इरफान उर्फ समीर मोहम्मद उमर वारसी

मुंबई : किरकोळ वादातून प्रियकरानेच प्रेयसीची कैचीच्या सहाय्याने निर्घृण हत्या केल्याची घटना बुधवारी कुर्ला येथे घडली. याप्रकरणी वी.बी नगर पोलिसांनी इरफान उर्फ समीर मोहम्मद उमर वारसी (२५) अशी अटक आरोपींची नावे आहेत.कुर्ला परीसरात राखी किरण मंगवाना (२४) ही तरुणी कुटुंबियांसोबत राहायची. त्याच परीसरात लेदरच्या कारखान्यात काम करत असलेल्या इरफान सोबत तिचे प्रेम जडले. दोघांच्या प्रेमसंबंधामुळे इरफानची पत्नीने वर्षभरापूर्वी घर सोडले. मुलाला घेऊन ती माहेरी निघून गेली. मात्र गेल्या काही दिवसांपासून पत्नी पुन्हा इरफानच्या संपर्कात आल्याने राखी आणि इरफानमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे इरफाने तिला कारखान्यात न येण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरी देखील बुधवारी दुपारी दिडच्या सुमारास राखी कारखान्यात आली. तिने पुन्हा इरफानसोबत भांडण सुरु केले. याच रागात त्याने कारखान्यातील मोठया कैचीने तिच्या मानेवर हल्ला चढविला. रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळलेल्या राखीला पाहून तोही घाबरला. त्याने तिला तत्काळ जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. उंचावरुन कैची मानेवर पडल्याने राखी जखमी झाल्याची माहिती त्याने तेथील डॉक्टरांना दिली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तेथील डॉक्टरांनी राखीला मृत घोषित केले. मात्र घटनास्थळी दाखल झालेल्या वी.बी नगर पोलिसांनी अधिक तपास सुरु केला. तपासामध्ये संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या इरफानला पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु असल्याची माहिती. वी.बी नगर पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)