शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

भोंगे राज्याचाच विषय, सरकार हात झटकतेय; मनसे अल्टिमेटमवर ठाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 10:05 IST

राज्य सरकारने भोंग्यांविरोधात कोणतीही ठोस भूमिका न जाहीर केल्याने मनसेने ३ मे च्या अल्टिमेटमबाबत ठाम असल्याचे यावेळी जाहीर केले आहे. 

मुंबई :  राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरविण्याच्या मुद्द्यावर राज्य सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याऐवजी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे उतरविण्यासाठी दिलेल्या ३ मे च्या अल्टिमेटमवर आम्ही ठाम आहोत, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सोमवारी स्पष्ट केले. 

राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीकडे राज ठाकरे यांनी पाठ फिरविली. मात्र, मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भोंग्यांबाबत केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. त्यावर मनसेने टीका केली. तसेच या बैठकीत राज्य सरकारने भोंग्यांविरोधात कोणतीही ठोस भूमिका न जाहीर केल्याने मनसेने ३ मे च्या अल्टिमेटमबाबत ठाम असल्याचे यावेळी जाहीर केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय जाहीर केला आहे. तो संपूर्ण देशाला लागू आहे. त्यामुळे भोंग्यांबाबत केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर निर्णय जाहीर करावा, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली. त्यावर बाळा नांदगावकर यांनी नाराजी व्यक्त केली. 

धार्मिक विषय नव्हे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व राज्यांना लागू होते, तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे राज्य सरकारला भोंग्यांबाबत आपली जबाबदारी झटकता येणार नाही. शिवाय, मशिदीवरील भोंग्यांचा त्रास सर्वांनाच होतो.  त्यामुळे हा एक धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. त्यामुळे भोंगे उतरविलेच पाहिजेत अशी मागणी नांदगावकर यांनी केली.

टॅग्स :MNSमनसे