शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

कृषी विकासाची गमावलेली संधी!

By admin | Updated: February 2, 2017 00:48 IST

जागतिक उत्पादनामध्ये भारताचा सहावा क्रमांक असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. वास्तविक भारताने २०१३-१४ मध्ये हा टप्पा गाठला होता आणि गेल्या अडीच वर्षांत त्यामध्ये

- पृथ्वीराज चव्हाण (माजी मुख्यमंत्री)जागतिक उत्पादनामध्ये भारताचा सहावा क्रमांक असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. वास्तविक भारताने २०१३-१४ मध्ये हा टप्पा गाठला होता आणि गेल्या अडीच वर्षांत त्यामध्ये कोणतीही प्रगती झाली नाही. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, असे विशेषण लावून देखील उत्पादन वाढलेले नाही.मोदी सरकारच्या चौथ्या अर्थसंकल्पाकडे एक गमावलेली संधी म्हणून पाहता येईल. ‘परिवर्तन-उर्जितावस्था-स्वच्छता’ या त्रिसूत्रीवर आधारित असलेल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ७ वर्षात कृषी उत्पन्न दुप्पट कसे करणार, ‘रोजगाराविना विकास’ व्यवस्थेत कसा बदल करणार, निश्चलनीकरणाचा हिशेब आणि त्यामुळे अर्थव्यवस्था किती प्रमाणात स्वच्छ झाली याबाबतीत एकही ठोस भाष्य करण्यात आलेले नाही. सामान्य माणसाला या अर्थसंकल्पात निश्चीत काय मिळाले?या वर्षीही अर्थव्यवस्थेचे गुलाबी चित्र रंगवून सामान्य जनतेला घोषणांमध्ये भुलवत ठेवण्याचे काम यंदाही चोखपणे चालु आहे.दहा मुद्यांवर आधारित अर्थसंकल्पामध्ये डिजिटल अर्थव्यवस्था वगळता सर्वच क्षेत्रांमध्ये अपेक्षाभंगच झाला आहे. जागतिकीकरणाच्या विरोधी वैश्विक वातावरणात विशेषत: अमेरीकन व्यापार संरक्षणवादी धोरणांना भारत कसे सामोरे जाणार आहे? मोदींनी निवडणुकीपूर्वी दरवर्षी दोन कोटी रोजगारनिर्मिती करू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आतापर्यंत पाच कोटी रोजगारनिर्मिती झाली पाहिजे होती. पण प्रत्यक्षात दीड लाखांपेक्षाही कमी रोजगारनिर्मिती झाली आहे. एका बाजूला कृषि उत्पन्न सात वर्षात दुप्पट करू या घोषणेचा पुनरु च्चार करण्यात आला आहे. पण त्या करीता दरवर्षी १८-१९ टक्के वाढ झाली पाहिजे. त्याच्या तुलनेत या वर्षी फक्त ४.१ टक्के विकास झाला आहे. त्यामुळे हाही एक निवडणुकीचा जुमला होता, हे स्पष्ट झाले आहे. वेगवर्धित सिंचन योजनेसाठी (एआयबीपी) सर्व देशाकरीता फक्त ३७५ कोटी रुपयांची तरतूद (गेल्या वर्षीपेक्षा १३७७ कोटी तरतुदीपेक्षा तब्बल ७१ टक्क्याने कमी) करण्यात आली आहे. देशातील ९३ अतिमहत्त्वाच्या सिंचन प्रकल्पांपैकी २३ प्रकल्प ३१ मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करू, असे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले होते. त्यापैकी एकही प्रकल्प अजून पूर्ण झालेला नाही.राष्ट्रीय महामार्गामध्ये १०,००० किमी रस्त्याचे उद्दीष्ट असताना फक्त ४०२१ किमी साध्य झाले. महात्मा गांधी रोजगार हमी उत्पन्न योजनेमध्ये (मनरेगा) मागील वर्षाच्या ४७,५०० सुधारित तरतुदींपेक्षा ४८,००० कोटी म्हणजेच फक्त एक टक्का वाढ करण्यात आलेली आहे. काळ््या पैश्यांवर अंकुश ठेवण्यासाठी तीन लाख रुपयांपेक्षा अधिकचे व्यवहार रोखीने करण्यास बंदी घालणारा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु ही मर्यादा आणखी कमी करता आली असती. तसेच राजकीय निधी बॉण्ड ही एक नविन कल्पना आहे. त्याची पूर्ण माहिती आल्यावर टिपणी करता येईल. राजकीय पक्षांच्या देणगीबाबत आणखी धाडसी पाऊल टाकायला पाहिजे होते. रोखीची मर्यादा दोन हजार रुपयापर्यंत खाली आणल्यामुळे राजकीय पक्षांना काहीही फरक पडणार नाही. याउलट राजकीय पक्षांच्या खात्यांचे आॅडिट करण्याची तरतुद करणे आणि राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याअंतर्गत आणणे, असे निर्णय घेणे अपेक्षित होते.