शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रांची लूट हा ‘अंडरवर्ल्ड’चा कट!पोलिसांना संशय : मुंबईतून आणखी तिघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 03:03 IST

नाशिकमध्ये पोलीस कारवाईत जप्त केलेला शस्त्रसाठा उत्तर प्रदेशातून लुटण्यात आला होता. मात्र ही केवळ चोरी नसून अंडरवर्ल्डच्या टोळीचा मोठा कट असल्याचा संशय पोलिसांना आहे. या कटात किमान ३५ जण सहभागी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शनिवारी मध्यरात्री मुंबईतून आणखी तिघांना पोलिसांनी नागपाड्याच्या कामाठीपुरा येथून ताब्यात घेतले.

मुंबई : नाशिकमध्ये पोलीस कारवाईत जप्त केलेला शस्त्रसाठा उत्तर प्रदेशातून लुटण्यात आला होता. मात्र ही केवळ चोरी नसून अंडरवर्ल्डच्या टोळीचा मोठा कट असल्याचा संशय पोलिसांना आहे. या कटात किमान ३५ जण सहभागी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शनिवारी मध्यरात्री मुंबईतून आणखी तिघांना पोलिसांनी नागपाड्याच्या कामाठीपुरा येथून ताब्यात घेतले.उत्तर प्रदेश येथील बांदा जिल्ह्यातून शस्त्रसाठा चोरून मुंबईकडे घेऊन येत असताना शिवडीतील अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेल्या बद्रीनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका उर्फ पाशा (२७) याच्यासह तिघांना नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या कटात उत्तर प्रदेशातील काही जणांसह मुंबईतल्या सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. नाताळ, नवे वर्ष, २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात घडविण्याचा प्रयत्न होता का, या दिशेने चौकशी सुरू आहे. अजूनही पाशाकडून योग्य ती माहिती समोर येत नसल्याने त्याच्याशी संलग्न असलेल्या तसेच त्याच्या संपर्कात असलेल्यांकडे गुन्हे शाखेसह एटीएसने मोर्चा वळवला आहे. शुक्रवारी सायन क्रॉस रोडवरून एकाला ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास नागपाडा येथील कामाठीपुरामधून एकाच कुटुंबातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.नाशिक पोलिसांची सावधगिरीचांदवडजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून ताब्यात घेतलेला दाऊदचा शार्पशूटर व त्याच्याकडून जप्त केलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सावधगिरी बाळगली जात आहे. संशयितांकडे मोठा शस्त्रसाठा सापडला. तसेच बेशुद्ध करण्याच्या औषधांच्या काही बाटल्या व ४८ हजारांची रोकडही पोलिसांनी हस्तगत केली आहे.पाशासोबत एकाचे संभाषण-पाशाच्या मोबाइल सीडीआरमधून अटक केलेल्यांपैकी एकासोबत संभाषण झाल्याचे समजते. तसेच तिघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यानुसार त्यांच्याकडे गुन्हे शाखेसह नाशिक पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकMumbai policeमुंबई पोलीस