शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

ऐन सुट्टीच्या हंगामात होतेय दुकानदारांकडून ग्राहकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 05:25 IST

निरीक्षकांची ६७ पदे रिक्त : वैधमापन शास्त्र विभागाचा कारभार अधांतरी

जमीर काझी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उन्हाळी सुट्टीच्या हंगामात कुटुंबीयासमवेत फिरण्यास बाहेर पडलेल्या प्रवाशांची महामार्गावरील मॉल्स व हॉटेल्समधून राजरोस लूट सुरू आहे. तेथे बाटलीबंद पाणी आणि खाद्यपदार्थ अव्वाच्या सव्वा दराने ग्राहकांच्या माथ्यावर मारले जात आहेत. त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी कार्यरत वैद्यमापन शास्त्र विभागाचा कारभार अधिकाऱ्याविना केवळ कागदावरच कार्यरत राहिला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एका अधिकाºयाकडे तीन-तीन जिल्ह्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याने, त्यांची अवस्था ‘न घर का न घाट का’ अशी बनली आहे. कारण या विभागाकडील निरीक्षकाची २८८ पैकी तब्बल ६७ पदे अनेक वर्षांपासून रिक्तच आहेत, तर सहायक नियत्रकांची सध्या १५ पदे रिक्त असून, येत्या महिन्याअखेरीस त्यामध्ये आणखी दोघांची भर पडणार आहे.

अन्न व औषध विभागाच्या अखत्यारित कार्यरत असलेले वैधमापन शास्त्र विभागाची अपुºया मनुष्यबळामुळे दिवसेंदिवस बिकट अवस्था होत चालली आहे. खाद्यपदार्थाचे सीलबंद पॅकेट, बाटलीबंद पाणी व अन्य वस्तूच्या विक्री करणाºया आस्थापनांवर नियंत्रण ठेवण्याचे काम या विभागाचे असते. त्यासाठी महसूल वर्गाप्रमाणे त्याचे सात विभाग करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये नियंत्रकाचे (कंट्रोलर) पद हे अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाºयाकडे असून, त्यांच्यामार्फत पूर्ण विभागाचे नियंत्रण चालविले जाते. त्यांच्यानंतरची विभागवार सात उपनियंत्रककार्यरत असले, तरी प्रत्यक्षात ‘फिल्ड’वरची कामे करणाºया सहायक नियंत्रक व निरीक्षक पदाचा वानवा आहे. दोन्ही पदासाठीअनुक्रमे ४६ व २८८ पदे मंजूर असली, तरी सध्या केवळ ३१ व २११ पदे पूर्ण राज्यात कार्यरत असल्याची माहिती विभागातील सूत्रांकडून देण्यात आली.

दोन्ही ठिकाणी अनुक्रमे १५ व ६७ पदे रिक्त असून, अधिकाऱ्यांच्या निवृत्तीप्रमाणे दरवर्षी त्यामध्ये वृद्धी होत राहिली आहे. त्यामुळे एका-एका अधिकाºयाकडे नियमित पदाशिवाय अन्य दोन-दोन, तीन-तीन ठिकाणांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.अशी चालते ग्राहकांची लुटमारसुट्टीच्या हंगामामुळे महामार्गावरील हॉटेल्स, दुकानाच्या ठिकाणी ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. या ठिकाणी १४ रुपयांची पाण्याची बाटली १८ ते २० रुपयांना विकली जात आहे. शीतपेय आणि फूड पॅकेट्सही छापील किमतीपेक्षा सरासरी ४ ते ८ रुपये अधिक दराने विकले जात आहेत. दराच्या तफावतीबाबत दुकानचालकाकडे विचारणा केल्यास, ‘या दरात तुम्हाला घ्यायची असेल, तर घ्या किंवा घेऊ नका,’ असे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांना गरजेपोटी जादा दराने वस्तू खरेदी करावे लागते. काही मॉल्स व हॉटेलच्या परिसरात वैधमापन विभागाकडून वस्तू विक्रीबाबतचे फलक लावले असून, तक्रारीसाठी संपर्क क्रमांक दिला आहे. मात्र, त्या क्रमांकावर कॉल केल्यानंतर कार्यवाही तर दूरच काहीच प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे विनाकारण वेळ वाया जात असल्याने नागरिकही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची परिस्थिती आहे.पाण्डेय, सानप यांच्या कारवाईचे स्मरणवैधमापन शास्त्र विभागाच्या नियंत्रकाने जर मनात आणले, तर लुटमार करणाºया अस्थापनावर वचक बसतो. साडेतीन, चार वर्षांपासून तत्कालीन नियंत्रक संजय पाण्डये यांनी नियमांची पायमल्ली करणाºयावर कारवाई करून, बेशिस्त मॉल, शॉपवर वचक बसविला. त्यांच्यापूर्वी डॉ. माधवराव सानप यांनी नियमबाह्य अस्थापनावर कारवाईचा बडगा उगारला होता. ग्राहकांना आता त्यांच्या कारकिर्दीचे स्मरण होत आहे.