शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पक्षात संशयास्पद वातावरण तयार करणाऱ्यांचा शोध घेऊ : संजय पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 06:20 IST

सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापासून स्थानिक पातळीवर वेगळ्या चर्चा करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. त्यांचा आम्ही शोध घेऊ, असे भाजपा खासदार संजय पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सांगली : पक्षातीलच काहीजण माझ्याविषयी जाणीवपूर्वक संशयास्पद वातावरण निर्माण करीत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापासून स्थानिक पातळीवर वेगळ्या चर्चा करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. त्यांचा आम्ही शोध घेऊ, असे भाजपा खासदार संजय पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.पाटील म्हणाले की, भाजपमध्ये गटबाजी नाही, मात्र काहीजण संशयास्पद वातावरण तयार करत आहेत, ही गोष्ट खरी आहे. आम्ही त्या गोष्टीच्या मुळाशी जाऊ. आमदार सुरेश खाडे यांनी कोणतेही गैर वक्तव्य केलेले नाही. कोणाचीच उमेदवारी निश्चित नसल्याने त्याबद्दल ठामपणे सांगणे योग्य नाही. खाडे यांनी केलेले वक्तव्य आकसबुद्धीतून नाही. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वी बऱ्याचदा जाहीर सभांमध्ये माझ्या उमेदवारीची घोषणा केली असली तरी, त्यांना तो अधिकार आहे, पण स्थानिक नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना अशाप्रकारच्या गोष्टी जाहीर करता येत नाहीत. पक्षाकडे मी रितसर उमेदवारीची मागणी केली आहे. माझे पाच वर्षातील काम चांगले असल्याने मी तसा दावा केला आहे. माझ्यासह अनेकजण खासदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असू शकतात. लोकशाही मार्गाने त्यांनी उमेदवारी मागणे यात गैर काही नाही. सर्वच पक्षातील लोकांशी माझे चांगले संबंध असल्याने त्याचा फायदा पक्षाला मतांच्या माध्यमातून होऊ शकतो.तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात माझे अधिक लक्ष असल्याबद्दल चर्चा होत असली तरी, सर्वत्रच माझा संपर्क आहे. तासगाव-कवठेमहांकाळच्या जनतेने माझ्या राजकीय जडणघडणीत मोठी साथ दिली आहे. त्यामुळे या भागाविषयी प्रेम असणे स्वाभाविक आहे. राजकीय पेरणी म्हणून तेथे मी कधीही लक्ष घातलेले नाही. त्यामुळे त्याअर्थाने कोणी येथील कामांकडे पाहू नये.अजितराव घोरपडेंशी चर्चाअजितराव घोरपडे भाजपचेच आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. पक्षाबद्दलच्या नाराजीची चर्चाही चुकीची आहे. काही दिवसांपूर्वीच आम्हा दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. त्यामुळे ते वेगळी राजकीय भूमिका घेत असल्याबद्दलची चर्चा चुकीची आहे, असे संजय पाटील म्हणाले.गर्भगळीत होणारा कार्यकर्ता नाही!पक्षांतर्गत कोण काय म्हणत असतो, कोणत्या चर्चा पसरविल्या जात असतात, याकडे मी फारसे लक्ष देत नाही. मी अशामुळे गर्भगळीत होणारा कार्यकर्ता नाही. विकासकामांच्या माध्यमातून माझे नाणे खणखणीत आहे. त्याच जोरावर मी उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे, असे संजय पाटील म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा