शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीपक्षामुळेच लांबला कोपर्डी खटला; सरकारी पक्षाचा आरोप: अंतिम युक्तिवादाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 20:01 IST

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्यात गुरूवारी जिल्हा न्यायालयात अंतिम युक्तिवादाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी या खटल्यातील विशेष सरकारी वकील अ‍ॅड. निकम यांनी मॅरेथॉन युक्तिवाद करत आरोपींविरोधातील पुराव्यांची जंत्री विषद केली.

अहमदनगर : कोपर्डी अत्याचार व खून खटल्याबाबत काही लोकांकडून न्यायालयाबाहेर प्रश्न उपस्थित करून सुनावणी लांबल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात मात्र सरकारी पक्षामुळे एकही सुनावणी लांबणीवर पडली नाही. आरोपी पक्षामुळेच आठ ते नऊ वेळा सुनावणी होऊ शकली नाही, असा आरोप विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केला.कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्यात गुरूवारी जिल्हा न्यायालयात अंतिम युक्तिवादाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी या खटल्यातील विशेष सरकारी वकील अ‍ॅड. निकम यांनी मॅरेथॉन युक्तिवाद करत आरोपींविरोधातील पुराव्यांची जंत्री विषद केली. कोपर्डी खटल्याबाबत काही लोकांकडून बाहेर होणा-या वक्तव्याबाबत निकम यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. या खटल्याचे जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकारी पक्षाने पाच महिन्यांत ३१ साक्षीदार तपासल्याचे सांगितले.कोपर्डी येथे १३ जुलै २०१६ रोजी चारी रस्त्यावर आरोपी क्रमांक एक जितेंद्र शिंदे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला. ही घटना घडण्यापूर्वी तिघा आरोपींनी सदर मुलीवर नजर ठेवली होती. घटनेच्या दोन दिवस आधी पीडित मुलगी व तिची मैत्रीण घरी जात असताना जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांनी त्यांना अडविले होते. शिंदे याने पीडित मुलीचा हात खेचला होता. यावेळी पीडित मुलीने विरोध केला तेव्हा भवाळ व भैलुमे यांनी ‘आपण हिला नंतर कामच दाखवू’ असे सांगितले होते. त्यानंतर भितीमुळे दोन दिवस सदर मुलगी शाळेत गेली नाही. तिघा आरोपींची मुलीवर वाईट नजर होती. यातूनच त्यांनी कट करून हे कृत्य केले. सदर मुलीवर शिंदे याने अत्याचार करून तिचा खून केला त्या दरम्यान आरोपी दोन व तीन हे त्या परिसरातील रस्त्यावरून फिरत होते, असे निकम यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आरोपीविरोधात सरकारी पक्षाच्यावतीने सादर केलेले साक्षीदार व पुराव्यातून हे कृत्य कसे केले हे सिद्ध होत आहे. मनुष्य खोटे बोलू शकतो मात्र परिस्थिती खोटे बोलत नाही असे सांगत निकम म्हणाले, खुनाच्या घटनेनंतर सदर मुलीस कुळधरण येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिचे शवविच्छेदन केले. या अहवालत किती निर्दयीपणे अत्याचार करून खून केला आहे हे समोर येते़ या घटनाक्रमाला आधार देणारे साक्षीदार आणि त्यांनी दिलेली माहिती यावेळी निकम यांनी विषद केली. खटल्याची शनिवारपर्यंत सलग सुनावणी होणार आहे. निकम यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आरोपी क्रमांक एक, दोन व तीनच्यावतीने युक्तिवाद केला जाणार आहे. गुरूवारी अ‍ॅड. निकम यांच्यासह आरोपी पक्षाचे वकील अ‍ॅड. योहान मकासरे, अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे, अ‍ॅड. प्रकाश आहेर उपस्थित होते.

क्रुरपद्धतीने केला मुलीचा खून

सदर मुलीच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. तिचा मृत्यू हा अनैसर्गिक आहे. अंगवर २६ जखमा, दोन्ही खांदे निखळलेले, दाताने चावा घेतल्याच्या जखमा अशा कृ्ररपद्धतीने मुलीचा खून केल्याचे या अहवालातून स्पष्ट होते. हा वैद्यकीय अहवाल घटनेतील वास्तवता विषद करतो असे यावेळी निकम यांनी आपल्या युक्तीवादात नमूद केले.

युक्तीवादाचे रेकॉर्डिंग

कोपर्डी खटल्याच्या अंतीम युक्तीवादाचे गुरूवारी न्यायालयात अ‍ॅडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. सरकारी व आरोपी पक्षाने मागितले तर त्यांना हे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

टॅग्स :AhmadnagarअहमदनगरCourtन्यायालयCrimeगुन्हाkopardi caseकोपर्डी खटला