शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘रामसर स्थळ’ यादीत सामील ‘लोणार’ला आता हवेत विकासाचे पंख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 07:32 IST

लोणार व सरोवर परिसराचा विकास थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या निगराणीखाली होणार असल्याने विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा करता येऊ शकते.

काही दिवसांपूर्वी ‘रामसर’ स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर जगप्रसिध्द लोणार सरोवर व परिसराला आता विकासाचे आणि पर्यटन वाढीसाठी मार्केटिंगचे पंख हवे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर पर्यटनप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लोणार व सरोवर परिसराचा विकास थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या निगराणीखाली होणार असल्याने विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा करता येऊ शकते.लोणारचे वेगळेपण काय?सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी उल्कापाताने तयार झालेले बसॉल्ट खडकातील जगातील सगळ्यात मोठे व एकमेव विवर. व्यास सुमारे १८३० मीटर. खोली १५० मीटर. वर्तुळाकार. परिघ सहा किमी. पाणी खारे.महाराष्ट्रातील सर्वात छोटे पक्षी अभयारण्य म्हणून अेाळख.सरोवर व परिसराच्या खास बाबीधारतीर्थ, गर्भगृहात तीन सावल्या पडणारे रामगया मंदिर.पुरातन कमळजा मातेचे मंदिर. १० हजार ५०० वर्षांपूर्वीची मंदिरे. दैत्यसुदन मंदिर हे शिल्पकलेचा अद्भुत नमुना. चुंबकीय तत्त्व असलेला झोपलेला मारोती.पौराणिक/ऐतिहासिक महत्त्व पद्म पुराण, स्कंद पुराण व विरज महात्म्यामध्ये लोणार गावाचा उल्लेख. पूर्वी वीरज तीर्थ तथा विष्णुगया म्हणून ओळखले जायचे. यादव काळातील काही मुख्य बाजारपेठेच्या शहरांमध्ये लोणारचे नाव होते. ३२ मंदिरे, १७ स्मारके, १३ कुंड, ४ पाण्याचे प्रवाह. आव्हाने...प्रदीर्घ कालावधीपासून लोणार दुर्लक्षित असल्याने आता सगळ्यांच्या नजरा. विकासासाठी ११ ते १२ शासकीय यंत्रणांच्या समन्वयाचा लागेल कस. नागपूर खंडपीठात दाखल याचिकेंतर्गत वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन.असा होईल विकास...एकूण विकास आराखडा २०५ कोटी रुपये. तीन ते चार टप्पे.येत्या वर्षात १०७ कोटी ६३ लाख महाराष्ट्र सरकार देणार. सरोवर परिसरात पदपथ निर्मिती, इलेक्ट्रिक वाहने सूचना फलक, परिसरातील वेडीबाभूळ काढणे, जैवविविधता जपणे ही कामेे.सरोवरात जाणारे सांडपाणी थांबवून शहर परिसरात भूमिगत गटार योजना राबवणे.एमटीडीसीअंर्गत संशोधन केंद्र, पर्यटक माहिती केंद्र, तारांगण व संग्रहालयाची कामे. जुन्या शासकीय इमारतींचे नूतनीकरण, व्ह्यू पॉइंट व पर्यटकांसाठी सुविधा. पुरातत्त्व विभागांतर्गत गायमुख मंदिर, कुंडाचे संवर्धन.

टॅग्स :Lonarलोणार