शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणे १३९ कोटींचे मालक, डोक्यावर २९ कोटींचे कर्ज; तर विनायक राऊतांकडे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 08:20 IST

केंद्रीय मंत्र्यांकडे नऊ किलो सोने, तर २८ किलो चांदी, नारायण राणे, त्यांची पत्नी नीलम राणे आणि एकत्रित कुटुंबांची मिळून ५४ कोटी ३७ लाख ९६ हजार ४९६ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता, तसेच विविध गुंतवणूक अशी मिळून सुमारे १३९ कोटींची मालमत्ता असून, १८ ते ७५ लाख रुपयांच्या किमतीची आठ वाहने आहेत, तर २९ कोटींचे कर्ज आहे.  

नारायण राणे यांची जंगम मालमत्ता १२ कोटी ४७ लाख ८६ हजार २८१, तर पत्नी नीलम यांच्या नावे दुप्पट म्हणजेच २४ कोटी १४ लाख ८३ हजार ३०८ रुपयांची मालमत्ता आहे. काैटुंबिक एकत्र मालमत्ता मिळून एकूण ५४ कोटी ४९ लाख ४२ हजार ७३० रुपयांची संपत्ती त्यांच्याकडे आहे. यात ९,०३३.२५ ग्रॅम सोने, २८ किलो चांदी आणि २,१३६ हिऱ्यांचे सेट आहेत. नारायण राणे, त्यांची पत्नी नीलम राणे आणि एकत्रित कुटुंबांची मिळून ५४ कोटी ३७ लाख ९६ हजार ४९६ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. विविध बँका, शेअर्स, बाँड याद्वारे ३० कोटी ९ लाख ४६ हजार ८०७ रुपयांची गुंतवणूक आहे.

राणे कुटुंबाकडे साडेतेरा कोटींचे दागिने राणे कुटुंबाचे एकत्र मिळून ९०३३.२५ ग्रॅम सोने (किंमत ६ कोटी २६ लाख ४० हजार ०८६), २८ किलो चांदी (किंमत २१ लाख ७२ हजार ८०० रुपये) आणि २१३६.५५ इतके जवाहिर (किंमत ६ कोटी ९५ लाख २४ हजार २३१ रुपये) मिळून एकूण १३ कोटी ४३ लाख ३७ हजार ११७ कोटींचे दागिने आहेत. 

कर्जदारही आहे राणे दाम्पत्य  : राणे दाम्पत्याच्या नावावर २९ कोटी १२ लाख ४३ हजार २५३ रुपये कर्ज आहे. 

विनायक राऊत यांच्याकडे ४ कोटी ९० लाखांची प्रॉपर्टीरत्नागिरी-सिंधुदुर्गमधील उद्धवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्याकडे स्थावर आणि जंगम मिळून एकूण ४ कोटी ९० लाख ३४ हजार ८२९ रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. त्यांची पत्नी शामल या जंगम मालमत्तेत त्यांच्यापेक्षा १६ लाख ७३ हजारांनी श्रीमंत आहेत. गेल्या वेळी राऊत यांची स्थावर मालमत्ता ३ कोटी ८७ लाख एवढी होती. यावेळी त्यांच्या जंगम मालमत्तेत ३८ लाखांची वाढ झाली आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Vinayak Rautविनायक राऊत lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग