शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कुणी पितात भरपूर पाणी, तर कुणी करतात योगासने; उन्हात उमेदवारांची घरोघरी पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 10:37 IST

तापमानाच्या वाढत्या पाऱ्याने उमेदवार, नेत्यांची त्रेधातिरपीट 

विश्वास मोरेपिंपरी (जि. पुणे) : लोकसभा प्रचाराचा आणि उन्हाचाही पारा वाढत आहे. मावळ मतदारसंघातील तापमान तर ४२ अंशांवर पोहोचले आहे. सकाळपासून घामाच्या धारा वाहत असताना दिवसभर उत्साह टिकवण्यासाठी, न थकता मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या मित्रपक्षांचे नेते आटापिटा करताना आरोग्याचीही विशेष काळजी घेत आहेत. 

प्रचारादरम्यान पाणी भरपूर पितोयमी पिंपरी गावात राहतो. निवडणुकीच्या रणधुमाळीतही दररोज साडेसहा वाजता उठतो.  त्यानंतर घरातच व्यायाम करतो. वर्तमानपत्रांचे वाचन करून सकाळी नऊला नाष्टा करतो. त्यानंतर नऊ ते दुपारी दीडपर्यंत प्रचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका होतात. उन्हाळा असल्यामुळे भरपूर पाणी पिण्यावर भर देतो. दुपारी दीडनंतर जेवण होते. पुन्हा चारपर्यंत बैठका चालतात. रात्री दहापर्यंत प्रचाराचे काम सुरू असते.   - संजोग वाघेरे, महाविकास आघाडीचे उमेदवार

योगा-प्राणायाम आणि जिममध्ये व्यायाम दररोज सकाळी सहाला उठल्यानंतर योगा-प्राणायाम, व्यायाम करते. तसेच, जिमलाही जाते. त्यानंतर साडेनऊ वाजता नाश्ता आणि घरातील व्यक्तींशी संवाद होतो. वर्तमानपत्रांचे वाचन होते. संपर्क कार्यालयातील बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद होतो.  दुपारी दोन वाजता जेवण ठरलेलेच! त्यानंतर पुन्हा भेटी,  बैठकामध्ये सहभाग. रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास प्रचार संपवून आल्यानंतर जेवण करते.  - अश्विनी जगताप, आमदार, भाजप, चिंचवड

झोप फक्त चार तासांचीसकाळी सहाला उठल्यानंतर ध्यानधारणा, सूर्यनमस्कार, योगा करतो. सकाळी साडेआठला घर सोडतो. मग भेटीगाठींवर भर असतो. तीन वाजता असेल तेथे जेवण करतो. त्यानंतर पुन्हा गावभेटी, कोपरा सभामध्ये सहभागी होऊन संवाद साधला जातो. रात्री दोन वाजता झोपतो. फक्त चार तासांची झोप होते. उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यावर भर देतो. - श्रीरंग बारणे, महायुतीचे उमेदवार

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४