शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

कोल्हापूरात महायुतीचा नवा डाव; शाहू छत्रपतींविरोधात समरजित घाटगे यांना उमेदवारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 9:26 AM

दिल्लीत गुरुवारी संध्याकाळी अमित शाह यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील नेत्याची जी चर्चा झाली त्या हा प्रस्ताव पुढे आला.

समीर देशपांडे

कोल्हापूर - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जागेवर महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती हे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. शाहू छत्रपती उभे राहणार असल्याने छत्रपती संभाजीराजे यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. कोल्हापूरची जागा महायुतीसाठी अवघड मानली जात आहे. त्यात आता भाजपाकडून धक्कादायक प्रस्ताव शिवसेनेपुढे ठेवला आहे.

शाहू छत्रपतींविरोधात छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्यातील भाजपा नेते समरजित घाटगे यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा हा प्रस्ताव आहे. खासदार संजय मंडलिक यांना विधान परिषदेचे सदस्य करून त्यांना राज्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यातील एका नेत्याने या प्रस्तावाला दुजोरा दिला. पण खासदार मंडलिक यांनी मतदारसंघात मीच तगडा उमेदवार असल्याचे जाहीर केले. 

दिल्लीत गुरुवारी संध्याकाळी अमित शाह यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील नेत्याची जी चर्चा झाली त्या हा प्रस्ताव पुढे आला. महाविकास आघाडीचे आमदार सतेज पाटील यांच्या आग्रहानुसार, शाहू छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असताना दुसरीकडे त्यांच्या तुलनेने मंडलिक यांची उमेदवारी दुबळी असल्याचे भाजपाचं म्हणणं आहे. त्यामुळे सर्वेक्षणाची आकडेवारी समोर ठेवत कोणताही धोका पत्करण्याची भाजपाची तयारी नाही. त्यामुळे समरजित घाटगे यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे आला आहे. 

समरजित घाटगे यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून गेली ५ वर्ष राजकारण, समाजकारणात सक्रीय आहेत. राजघराण्याच्या जनक घराण्याचे वलय, तुलनेत नवा चेहरा आणि महायुतीची ताकद यामुळे घाटगे यांचे नाव पुढे आणण्यात आले आहे. 

मुश्रीफ, महाडिकांवर जबाबदारीसमरजित घाटगे यांची उमेदवारी ठरली तर पालकमंत्री आणि घाटगे यांचे कट्टर विरोधक असलेले हसन मुश्रीफ आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर प्रामुख्याने घाटगे यांच्या विजयाची जबाबदारी असेल. घाटगेंची उमेदवारी ठरवतानाच मुश्रीफदेखील आपले विधानसभेचे गणित सोडवूनच मग मान्यता देणार यात शंका नाही. घाटगे निवडून गेल्यानंतर तेच जर मुश्रीफांच्या प्रचार प्रारंभाला खासदार म्हणून उपस्थित राहणार असतील तर मुश्रीफ खरोखरच हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करणार यात शंका नाही. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४kolhapur-pcकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे