शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
2
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मार्चला महायुतीची रॅली
3
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
4
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
5
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
6
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
7
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
8
संपादकीय: विवेकाला बळ, पण...
9
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
10
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
12
बारामती: त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण होते, डीसीसी बँक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई 
13
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
14
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
15
...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला
16
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
17
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
18
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
19
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण
20
मोदी हिंदी पट्ट्यात लावणार जोर; महाराष्ट्र, प. बंगालवरही फोकस

अमरावतीत महायुतीला धक्का, भाजपाला टेन्शन; नवनीत राणांविरोधात 'प्रहार'चा उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 2:23 PM

Amravati Loksabha Election 2024: दिनेश बूब हे इच्छुक उमेदवार होते. शिवसेना ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला दिली. दिनेश बूब यांना प्रहारचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवत आहोत असं प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांनी सांगितले.

अमरावती - लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर आता बच्चू कडू यांची प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. प्रहारने या लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटातून आलेल्या दिनेश बूब यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. 

प्रहारचे आमदार राजकुमार पटेल म्हणाले की, प्रहारच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. अमरावतीत संघटनेने उमेदवार उतरावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. माझ्यावर बच्चू कडूंनी जबाबदारी दिली. अमरावतीत मैत्रीपूर्ण लढत लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. दिनेश बूब यांनी निवडणुकीत उभं राहण्याचा निर्णय घेतला. अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रहारचे उमेदवार असतील अशी घोषणा मी करतो असं त्यांनी सांगितले. 

तसेच दिनेश बूब हे इच्छुक उमेदवार होते. शिवसेना ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला दिली. दिनेश बूब यांना प्रहारचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवत आहोत. बूब यांच्याबाबत मतदारसंघात सकारात्मक वातावरण आहे. अमरावती मतदारसंघात २ आमदार आहेत. आम्हाला लोकसभेची एक जागा हवी होती. महायुतीत आम्ही एक जागा मागितली तर चुकीचे काय? पक्ष वाढावा असं सगळ्यांनाच वाटते असं आमदार राजकुमार पटेल यांनी म्हटलं.

दरम्यान, माझ्यासमोर २ उमेदवार आहेत ते विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत. सरकारी पैशातून श्रेयवादाचे बॅनर्स लावणे हे मला कुणी शिकवलं नाही. मी शेकडो कोटी रुपयाचे काम केले पण कुठेही माझ्या नावाचा बोर्ड लावला नाही. विकासकामे होत राहतील पण समाजासमाजामध्ये दरी निर्माण होत आहे. ही दरी दूर करण्यासाठी चांगल्या लोकप्रतिनिधीची गरज आहे असं दिनेश बूब यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरेंनी राजीनामा मागितला तर...

प्रहार ही संघटना शिवसेनेतूनच निर्माण झालीय, त्यामुळे आमच्यासाठी वेगळा पक्ष नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा सोपस्कार करण्याची आवश्यकता वाटत नाही. शिवसेना रक्तातून काढू शकत नाही. हा भावनिक विषय, भगवा झेंडा हाती घेऊनच निवडणुकीला सामोरे जाणार आहे. जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा मागितला तर देऊ. प्रहारकडून ही निवडणूक लढवावी अशी सर्वांची इच्छा आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४navneet kaur ranaनवनीत कौर राणाBacchu Kaduबच्चू कडूamravati-pcअमरावती