शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा उद्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 10:41 IST

पा. वा. गाडगीळ आर्थिक विकास लेखन आणि म. य. दळवी शोधपत्रकारिता स्पर्धेंतर्गत उत्कृष्ट लिखाण पाठविणाऱ्या प्रत्येकी पहिल्या तीन लेखकांना व पत्रकारांना अनुक्रमे २५ हजार रुपये, २० हजार रुपये आणि १५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे.

नागपूर : ‘लोकमत’चे प्रथम संपादक पत्रपंडित पा. वा. गाडगीळ आणि ‘लोकमत’चे द्वितीय संपादक पत्रमहर्षी बाबा दळवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभ बुधवार, दि. २३ मार्चला दुपारी ३ वाजता हॉटेल सेंटर पाॅइंट येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे हे ३३वे वर्ष आहे.नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या समारंभाला द वायरचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ वरदराजन हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. ‘युक्रेन संघर्ष : भारतासह जगावर आणि माध्यमांवर होणारा परिणाम’ असा व्याख्यानाचा विषय आहे. ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार असून, माजी उद्योग व शालेय शिक्षणमंत्री तथा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा हे अध्यक्षस्थानी राहतील.पा. वा. गाडगीळ आर्थिक विकास लेखन आणि म. य. दळवी शोधपत्रकारिता स्पर्धेंतर्गत उत्कृष्ट लिखाण पाठविणाऱ्या प्रत्येकी पहिल्या तीन लेखकांना व पत्रकारांना अनुक्रमे २५ हजार रुपये, २० हजार रुपये आणि १५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी आलेले लेख व वृत्तांचे निष्पक्ष संपादकांकडून परीक्षण करून त्यांनी निवडलेल्या स्पर्धकांना पुरस्कार दिले जातात. गेल्या तीन वर्षांतील एकूण १८  जणांना पुरस्कार देण्यात येतील.राज्यभरातील विशेषत: ग्रामीण भागातील पत्रकार, लेखक यांच्यातील प्रतिभेला वाव मिळावा, त्यांना कसदार पत्रकारिता करता यावी आणि वृत्तपत्रांचा दर्जा उंचावत राहावा, या उद्देशाने ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या वतीने हा उपक्रम अव्याहतपणे राबविला जात आहे. आपल्या संपादकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ असा उपक्रम राबविणारे ‘लोकमत’ हे देशातील पहिलेच वृत्तपत्र मानले जात आहे.