शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

Samruddhi Mahamarg: समृद्धीवर ‘लोकमत’ला दिसला वेगाचा थरार; माणसे कमी अन् कुत्री, साप, वानरांचेच स्पीड ब्रेकर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 06:34 IST

दाेन प्रतिनिधी, एक फाेटाेग्राफर यांच्या प्रत्यक्ष अनुभवातील ‘लाइव्ह रिपोर्ताज’ 

साहेबराव नरसाळे/ अरुण वाघमोडे    लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : शिर्डी इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गावर प्रवेश करताच सिमेंटच्या चकचकीत रस्त्यावर कारने ताशी १२० किलोमीटरचा वेग धरला. काही अंतर पार केल्यावर अचानक एक कुत्रा कारसमोर आला अन् समृद्धीच्या प्रवासात पहिला अडथळा आला. पुढे थांबत, लोकांशी संवाद साधत रस्त्याचे निरीक्षण करीत नागपूरच्या दिशेने निघालो. या प्रवासात सकाळी साडेदहा ते सायंकाळी ७ या नऊ तासांच्या प्रवासात वेगाचा थरार पाहायला मिळाला. माणसे कमी अन् कुत्री, साप, वानर अशा प्राण्यांच्या स्पीड ब्रेकरची जणू रांगच लागली. हे अडथळे ओलांडत आम्ही महामार्गालगतच्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही गावांतही डोकावून पाहिले.

Samruddhi Mahamarg Toll Rate: समृद्धीवर किती लागेल टोल? बाबो! शिर्डी-नागपूर प्रवासात तब्बल १८ ठिकाणी टोल नाके

 सुमारे २० किलोमीटर प्रवास केल्यानंतर संवत्सर (ता. कोपरगाव) गावाच्या हद्दीत एक व्यक्ती महामार्ग ओलांडून त्याच्या घराकडे जाताना दिसला. त्याला थांबवून त्याच्याशी चर्चा केली. त्याच्या गावात जाण्यासाठी महामार्गावरून इंटरचेजची सुविधा नाही. त्यामुळे पुढील पिंपळगावचे इंटरचेंज किंवा मागील शिर्डी इंटरचेंज गाठावे लागते.  

रस्ता निर्मनुष्य, क्वचितच एखादे वाहन रस्त्यावर दिसत होते. हे वाहनही वेगाची मर्यादा ओलांडून अगदी १८० च्या वेगाने धावत असावे, असे भुर्रकन निघून जात होते. महामार्गाच्या कडेला हिरवीगार पिके डौलाने शेतात उभी होती. महामार्गावरून एक-दीड किलोमीटरच्या अंतरावर अधूनमधून एखादे गाव झर्रकन नजरेसमाेरून जाई. इच्छा असूनही त्या गावात जाता येत नव्हते. महामार्गाच्या दुतर्फा सिमेंटचे ढापे टाकून उभारलेली भिंत आडवी ठाकलेली. महामार्गावरून खाली उतरण्यासाठी कोठेही मुभा नाही.   

पहिला इंटरचेंज औरंगाबाद जिल्ह्यातील हडसपिंपळगाव येथे लागला. दौलताबाद इंटरचेंज येथे आम्ही कार महामार्गावरून खाली उतरविली आणि पहिला टोल लागला. येथे टोल भरून एक वळसा घेऊन आम्ही पुन्हा महामार्गावर जाण्यासाठी निघालो तर दुसरा टोल आडवा आला.  वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या हद्दीत महामार्गावरील पुलाखाली एका टपरीचालकाशी संवाद साधला. तेथून नागपूर जिल्ह्याच्या हद्दीत आम्ही पोहोचलो. कारमधील डिझेलने तळ गाठला होता. त्यामुळे पेट्रोल पंप शोधत आम्ही महामार्गावरून खाली उतरून हिंगणा तालुक्यातील वडगावात दाखल झालो.

टायर फुटला, काय करायचे? रस्त्यात कुठेतरी काम करणारे कर्मचारी, क्वचितच दिसणारे पेट्रोल पंप आणि रस्त्यालगत शेळ्या, जनावरे चारताना दिसणारे शेतकरी इतकाच काय तो वावर या महामार्गावर दिसला. बाकी अनेक किलोमीटरपर्यंत नीरव शांतता होती. गाडीचा टायर फुटला किंवा अचानक काही बिघाड झाला तर सध्या तरी या महामार्गावर कुठे काहीच सुविधा दिसली नाही.

महामार्गावर यायला लागतो एक तासशिर्डी ते नागपूरपर्यंत महामार्गाच्या लगत अनेक गावे आहेत. मात्र तेथे जाण्यासाठी थेट रस्ता नाही. इंटरचेंजच्या माध्यमातून गावांना रस्ता जोडलेला आहे. त्यामुळे महामार्गावरून गाव जवळ दिसत असले तरी तेथे  पोहोचायला अर्धा ते एक तास वेळ लागतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केल्यानंतर रविवारी रात्री ‘लोकमत’ टीमने नागपूर ते शिर्डी असा नॉनस्टॉप प्रवास केला. त्यानंतर सोमवारी सकाळी १०.३० वाजता शिर्डी ते नागपूर असा प्रवास करीत ‘लोकमत’ने महामार्गावरून गावांमध्ये डोकावण्याचा व श्वास घेण्याची ठिकाणे शोधण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग