शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

Lokmat Sarpanch Awards 2018 : औरंगाबादमधील संतोष जोशी यांना ‘लोकमत सरपंच ऑफ द इयर’ (उदयोन्मुख सरपंच) पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 15:20 IST

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (उदयोन्मुख सरपंच) हा पुरस्कार औरंगाबादमधील खुलताबाद तालुक्यात असलेल्या गोळेगावचे सरपंच संतोष बाळकृष्ण जोशी यांना देण्यात आला. 

मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (उदयोन्मुख  सरपंच) हा पुरस्कार औरंगाबादमधील खुलताबाद तालुक्यात असलेल्या गोळेगावचे सरपंच संतोष बाळकृष्ण जोशी यांना देण्यात आला. 

गट - उदयोन्मुख सरपंचसरपंचाचे नाव - संतोष बाळकृष्ण जोशीगाव - गोळेगावतालुका - खुलताबादजिल्हा - औरंगाबाद

गावासाठी धडाडीचे नेतृत्व...

मुंबईसारख्या महानगरात चित्रपटसृष्टीत यशस्वी कारकीर्द सुरू असताना संतोष जोशी गावाच्या ओढीने गोळेगावला परतले. ग्रामस्थांनीही त्यांचे उत्स्फुर्त स्वागत करीत त्यांना सरपंचपदी निवडून दिले. सन २००५ ते २०१० पर्यंत सरपंच, २०१० ते १५ उपसरपंच आणि २०१५पासून पुन्हा सरपंच असा त्यांचा यशस्वी कार्यकाळ आहे. या काळात त्यांनी स्वच्छता, आरोग्य, आधुनिक तंत्रज्ञान, अशा क्षेत्रात त्यांनी जातीनेलक्ष घालून आपल्या गावाचा विकास घडवू आणला. त्यांची धडाडी पाहून ग्रामस्थ खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. तसेच प्रशासनाकडूनही त्यांना पूर्ण सहकार्य मिळत आहे. पूर्वी गोळेगावाला दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासूनच टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत असे. मात्र यंदा पाऊस कमी होऊनही जोशी यांच्या प्रयत्नांमुळे गावात अद्याप पाणी टंचाई भासलेली नाही आणि यापुढेही टँकरची आवश्यकता भासणार नाही, असा जोशी यांना विश्वास आहे.

राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाखपंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते. 

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्Maharashtraमहाराष्ट्र