शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

Lokmat Sarpanch Awards 2018 : जळगावचे पुरुजित चौधरी यांना ‘लोकमत सरपंच ऑफ द इयर’ (रोजगारनिर्मिती प्रोत्साहन) पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 16:13 IST

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात राज्यातील सरपंचांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (रोजगारनिर्मिती प्रोत्साहन) हा पुरस्कार जळगावमधील डांमुर्णी गावचे सरपंच पुरुजित गणेश चौधरी यांना देण्यात आला.  

मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात राज्यातील सरपंचांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (रोजगारनिर्मिती प्रोत्साहन) हा पुरस्कार जळगावमधील डांमुर्णी गावचे सरपंच पुरुजित गणेश चौधरी यांना देण्यात आला.  

गट - रोजगारनिर्मिती प्रोत्साहनसरपंचाचे नाव - पुरुजित गणेश चौधरीगाव - डांमुर्णीतालुका - यावलजिल्हा - जळगाव

शासनाच्या योजनांचा पाठपुरावा करण्यात मोलाची कामगिरी

गोरगरीब, वंचितांसाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र त्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत न पोहोचल्यामुळे ते या योजनांपासून वंचित राहतात. अशा वंचितांना त्यांच्या हक्क मिळवून देण्यासाठी पुरुजित चौधरी अनेक वर्षे काम करीत आहेत. २०१५ पासून डांभुर्णीचे सरपंच पद भूषविणाऱ्या चौधरी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेची महाराष्टÑात प्रथम क्रमांकाची अंमलबजावणी केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे ७१६ लाभार्थींना त्यांच्या हक्काची जागा मिळाली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३६८ लाभार्थींना घरकूल मिळवून देण्यातही त्यांनी मोलाची मदत केली. वस्तीत दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत समाजमंदिर बांधकाम व गटारांचे बांधकामही त्यांनी करवून घेतले. दूषित पाणी पुरवठा रोखण्यासाठी त्यांनी सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याची टाकी, जलवाहिनी दुरुस्तीचे काम आदी कामे करवून घेतली. गावातील शौचालयांची संख्या ४० टक्क्यांवरून ८० टक्क्यांपर्यंत नेण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.

राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाखपंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते. 

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्Maharashtraमहाराष्ट्र