शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

Lokmat Sarpanch Awards 2018 : डॉ. मिलिंद पवार यांना ‘लोकमत सरपंच ऑफ द इयर’ (वैद्यकीय) पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 16:06 IST

‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (वैद्यकीय) हा पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या सौंदाणे गावचे सरपंच डॉ. मिलिंद तुकाराम पवार यांना प्रदान करण्यात आला.  

मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात राज्यातील सरपंचांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (वैद्यकीय) हा पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या सौंदाणे गावचे सरपंच डॉ. मिलिंद तुकाराम पवार यांना प्रदान करण्यात आला.  

गट - वैद्यकीयसरपंचाचे नाव - डॉ. मिलिंद तुकाराम पवारगाव - सौंदाणेतालुका - मालेगावजिल्हा - नाशिक

गावातील आरोग्य सेवांवर अधिक भर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून डॉ. मिलिंद पवार मालेगाव तालुक्यातील सरकारी रुग्णालयांत दर महिन्याच्या ९ तारखेला गरोदर महिलांसाठी विनामूल्य सेवा देतात. तसेच गावात विविध आरोग्य सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी विनामूल्य आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्यात स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, मधुमेह आदी आजारांची तपासणी करून औषधांचेही वाटप करण्यात येते. तसेच मोतीबिंदुसारख्या शस्त्रक्रियाही विनामूल्य करण्यात येतात.गावातील बंधारपाडे आणि वागदेव माथा या आदिवासी वस्तींची पिण्याच्या पाण्याची समस्या डॉ. पवार यांनी कायमची सोडवली. या वस्तींवर पवार यांनी स्वखर्चाने बोअर उपलब्ध करून दिल्या. तसेच स्मशानभूमीचे सुशोभीकरण, वैकुंठरथाची सोय आदी गोष्टीही पवार यांनी गावासाठी केल्या. डॉ. पवार यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावात वृक्ष लागवड, स्वच्छता अभियानेही राबविण्यात येतात.कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे यासाठी त्यांनी स्वत:च्या रुग्णालयात विशेष शिबीर आयोजित केले होते. त्यात तपासणी करण्यात आलेल्या ५० पैकी ६ महिलांनी गर्भाशयाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य झाले आणि हे उपचारही त्यांना सवलतीच्या दरात देण्यात आले.

राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाखपंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते. 

 

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्Maharashtraमहाराष्ट्र