लोकमत पां.वा. गाडगीळ आणि बाबा दळवी स्मृती पत्रकारिता पुरस्कार २०१८-१९ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 03:15 AM2020-10-10T03:15:24+5:302020-10-10T03:17:33+5:30

पुण्याचे विलास पंढरी व नागपूरचे नरेश डोंगरे प्रथम

lokmat p v Gadgil and Baba Dalvi Memorial Journalism Award 2018-19 announced | लोकमत पां.वा. गाडगीळ आणि बाबा दळवी स्मृती पत्रकारिता पुरस्कार २०१८-१९ जाहीर

लोकमत पां.वा. गाडगीळ आणि बाबा दळवी स्मृती पत्रकारिता पुरस्कार २०१८-१९ जाहीर

Next

नागपूर : लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित व लोकमतचे प्रथम संपादक पद्मश्री पां. वा.गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन पत्रकारिता स्पर्धा आणि पत्रमहर्षी व लोकमतचे ज्येष्ठ संपादक म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा २०१८-१९ चे निकाल जाहीर करण्यात येत आहेत.

पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे- पां.वा. गाडगीळ आर्थिक-विकासात्मक लेखन स्पर्धा- वर्ष २०१८- १९
प्रथम- विलास पंढरी, पुणे. (अनुदान आणि मोफत योजना, सामना); द्वितीय-हणमंत पाटील, पिंपरी चिंचवड. (नोकरी सोडून भाजी विकण्याचे वेड, लोकमत); तृतीय-प्रमोद जाधव (जलाशये निर्मावी नानाविध, पुढारी).
म.य. उपाख्य बाबा दळवी शोधपत्रकारिता स्पर्धा- वर्ष २०१८-१९- प्रथम-नरेश डोंगरे, नागपूर (फेसबुक फ्रेन्ड हेरगिरी करवून घेऊ शकतो, लोकमत); द्वितीय- प्रवीण राऊत, नागपूर (मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल निविदा घोटाळा, तरुणभारत); तृतीय- संजय पाटील, कºहाड (कागदी पिशव्यांचा कोटींचा घोटाळा, लोकमत) दोन्ही गटांच्या
पात्र प्रवेशिकांमधून तीन-तीन विजेत्यांची निवड करण्यात आली.

Web Title: lokmat p v Gadgil and Baba Dalvi Memorial Journalism Award 2018-19 announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.