शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत'मुळं गरीब लेखकाला समजलं 'माणुसकीचं मोठेपण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 19:05 IST

अनेक कथा, कादंबऱ्या लिहिणाऱ्या एका लेखकाच्या गोष्टीचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश केला गेला; मात्र पोट भरण्यासाठी हा लेखक दुसऱ्या शेतात मोलमजुरी करत असल्याची संवेदनशील स्टोरी  लोकमतमधून प्रसिद्ध होताच अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केला.

उंब्रज, दि. 4 - अनेक कथा, कादंबऱ्या लिहिणाऱ्या एका लेखकाच्या गोष्टीचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश केला गेला; मात्र पोट भरण्यासाठी हा लेखक दुसऱ्या शेतात मोलमजुरी करत असल्याची संवेदनशील स्टोरी  लोकमतमधून प्रसिद्ध होताच अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केला.सातारा येथील चंद्रशेखर शिंदे-देशमुख यांनी दहा हजारांचा धनादेश शंकर कवळे यांच्या हातात सुपूर्द केला. तसेच साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते अन युवा स्वयंरोजगार संस्थेचे अध्यक्ष सचिन अवघडे यांनीही पाच हजारांची रक्कम कवळे यांच्या कुटुंबीयाला दिली. कऱ्हाड तालुक्यातील मरळी गावात राहणारे शंकर कवळे यांच्या अनेक कादंबऱ्या  प्रकाशित झाल्या असून, विविध पुस्तकेही प्रकाशन संस्थांनी बाजारात आणली आहेत. एका झोपडीत राहणाऱ्या कवळे यांना परिस्थितीपोटी गवंडी काम करावे लागत असून, सध्या त्यांचे हातावरच पोट भागविली जाते.कºहाड तालुक्यातील मरळी हे छोटं गाव. खंडोबाच्या पाली या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर हे गाव वसलेलं आहे. या गावात शंकर दिनकर कवळे यांचा जन्म झाला. वडील दिनकर हे दोरखंड वळायचे काम करत तर आई शकुंतला शेतमजुरी करायची. पाच भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार. एक गुंठा जमीन नाही. गरिबी पाचवीला पुजलेली; पण शंकर यांना शिकायचं होतं.घरच्या आर्थिक परिस्थितीशी झगडत त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आणि शेवटी परिस्थिती पुढे हार पत्करली. दुगलीवरची गाई घेऊन तिला चरण्यासाठी डोंगर गाठू लागले; पण काही तरी शिकायचेच ही इच्छा गप्प बसू देत नव्हती. मोठ्या भावाने आणलेली लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, बाबा कदम यांची पुस्तके ते डोंगरात बसून वाचू लागले आणि हीच पुस्तके त्यांच्या लेखणीला प्रेरणादायी ठरली. अन् कवळे यांचीच कथा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी दिला आहे. हा त्यांच्या प्रतिभेचा गौरव आहे. परिस्थितीशी झगडत असलेल्या कवळे यांना सातारकरांनीही मदतीचा हात पुढे देऊ केला आहे.