शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2019: तुमच्या बायोपिकमध्ये कोणी काम केलेलं आवडेल; मुख्यमंत्री म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 16:31 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिलखुलास मुलाखत

मुंबई: सध्या अनेक व्यक्तीमत्त्वांच्या आयुष्यावर बेतलेले चित्रपट येत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट नुकतेच येऊन गेले. त्यामुळेच लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर 2019 या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुमच्या आयुष्यावर चित्रपट आला, तर त्यात तुमची भूमिका कोणी साकारलेली आवडेल, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना अभिनेता रितेश देशमुखनं विचारला. यावर मुख्यमंत्र्यांनी अगदी स्मार्ट उत्तर दिलं. साडेचार वर्ष तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. लवकरच तुम्ही पाच वर्षे पूर्ण करणारे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठराल. तुमच्या आयुष्यावर चित्रपट आल्यास, त्यात कोणत्या अभिनेत्यानं तुमची भूमिका केलेली आवडेल, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर कर्तृत्वानं तितका मोठा झालो की बायोपिक करता येईल, असं उत्तर त्यांनी दिलं. 'माझं कर्तृत्व फार मोठं नाही. मी कर्तृत्वानं तितका मोठा झाल्यावर बायोपिकचा विचार करु,' असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.बायोपिकवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मार्मिक टोलादेखील लगावला. माझं कर्तृत्व फार मोठं नाही. त्यामुळे बायोपिक नाही. तोपर्यंत सध्या चला हवा येऊ द्या ठीक आहे. त्यात भाऊ कदम जी मिमिक्री करतात, तिच राहू दे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. लोकमत महाराष्ट्रीन ऑफ द इयर 2019 सोहळा आज वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये संपन्न झाला. या सोहळ्याचं हे सहावं वर्ष होतं. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांचा या सोहळ्याच्या माध्यमातून गौरव करण्यात आला.

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBiopicआत्मचरित्रChala Hawa Yeu Dyaचला हवा येऊ द्या