महाराष्ट्राच्या हितासाठी झटणाऱ्या, समाजासाठी सर्वस्व वेचणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना लोकमत समूहाच्या वतीने 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठी नुकतीच नामांकनं जाहीर करण्यात आली आहेत. लोकसेवा-समाजसेवा या कॅटेगरीमध्ये अहिल्यानगरच्या जालिंदर बोरुडे यांची निवड करण्यात आली आहे.
जालिंदर बोरुडे यांनी ‘फिनिक्स सोशल फाऊंडेशन’च्या माध्यमातून नेत्रदानाची चळवळ सुरू केली. विडी कामगार, शेतकरी, मजूर, हमाल, महिला आणि गरिबांसाठी ते अहोरात्र झटतात. जिल्ह्यातील विविध भागांत दरमहा पाच नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करतात. आतापर्यंत १,१६० अंधांना मरणोत्तर नेत्रदानातून नवदृष्टी मिळाली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
जालिंदर यांचा हा प्रवास सोपा नव्हता. नगर जिल्ह्यातल्या नागरदेवळे गावातली जालिंदर यांना नोकरी मिळत नव्हती. १९८३ साली घरची गरिबी त्यामुळे जालिंदर मजुरी करून उदरनिर्वाहासाठी पैसे मिळवत असे. त्याच्या आईच्या डोळ्याला मोतीबिंदू झालेला. तातडीने शस्त्रक्रियेची गरज होती. पण नागरदेवळासारख्या गावात उपचाराची सोय नव्हती. जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारी दवाखान्यात शस्त्रक्रिया व्हायच्या. पण त्यासाठी नंबर लावावा लागायचा. वेटिंग लिस्ट मोठी असायची. महिनोन्महिने नंबर लागायचा नाही. खासगी दवाखान्यात सोय होती, पण आधी पैसे भरावे लागायचे. पण पैशांची अडचण होती.
उपचारासाठी नव्हते पैसे
या सगळ्या अडचणीत शस्त्रक्रिया झालीच नाही आणि जालिंदर यांच्या आईचा डोळा गेला. तेव्हा जालिंदर यांना खूप वाईट वाटलं. आईचा डोळा आपण वाचवू शकलो नाही, याची सल त्याला बोचत होती. मोतीबिंदू, डोळ्यांच्या समस्या असलेले आणि उपचारासाठी पैसे नसलेले अनेकजण जालिंदर यांना दिसू लागले. आईच्या गेलेल्या डोळ्याची भरपाई करण्याचा मार्ग जालिंदर यांना दिसला.
नेत्रदानाची चळवळ सुरू
पैशांअभावी डोळ्यांच्या समस्यांवर उपचार करू शकत नसलेल्यांसाठी मोफत शिबिर भरवण्याची कल्पना त्याला सुचली. धडपड करून, स्वत: पैसे खर्च करून त्यांनी पहिलं शिबिर भरवलं आणि नागरदेवळे गावात जालिंदर बोरुडे नावाच्या नेत्रदूताचा जन्म झाला. १९९१ साली जालिंदर बोरुडे यांनी ‘फिनिक्स सोशल फाऊंडेशन’च्या माध्यमातून नेत्रदानाची चळवळ सुरू केली.
१,१६० अंधांना मरणोत्तर नेत्रदानातून नवदृष्टी
विडी कामगार, शेतकरी, मजूर, हमाल, महिला आणि गरिबांसाठी जालिंदर अहोरात्र झटतात. जिल्ह्यातील विविध भागांत दरमहा पाच नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करतात. त्याचा लाभ जिल्ह्यासह राज्यातील गरजू घटकांना होत आहे. गेली ३३ वर्षे नेत्रदान आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियांच्या माध्यमातून त्यांनी लाखो गरजूंना प्रकाश दाखविला. आतापर्यंत १,१६० अंधांना मरणोत्तर नेत्रदानातून नवदृष्टी मिळाली. तर ३ लाख ७६ हजारांहून अधिक रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मोफत नेत्र उपचार आणि आधुनिक सेवा देणारे फिनिक्स नेत्रालय उभारण्यासाठी आता बोरुडे यांचे प्रयत्न सुरू आहेत.
लोकसेवा-समाजसेवा कॅटेगरीतील नामांकनं पाहण्यासाठी आणि मत देण्यासाठी इथे क्लिक करा.
Web Summary : Jalinder Borude, driven by his mother's blindness due to poverty, provides free eye care. His Phoenix Foundation restored sight to 1,160 people via eye donation and performed 376,000 free cataract surgeries, offering light to those in need.
Web Summary : गरीबी के कारण अपनी माँ के अंधेपन से प्रेरित होकर जालिंदर बोरुडे मुफ्त नेत्र देखभाल प्रदान करते हैं। उनके फीनिक्स फाउंडेशन ने नेत्रदान के माध्यम से 1,160 लोगों की दृष्टि बहाल की और 376,000 मुफ्त मोतियाबिंद सर्जरी की, जरूरतमंदों को रोशनी दी।