लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२: क्रीडा विश्वातील कोणत्या शिलेदाराला तुम्ही पुरस्कारासाठी निवडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 01:36 PM2022-09-16T13:36:15+5:302022-09-16T13:48:14+5:30

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा कृतज्ञ सन्मान म्हणजे, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार.

Lokmat Maharashtrian of the Year 2022: Vote For The Sportsperson In Maharashra | लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२: क्रीडा विश्वातील कोणत्या शिलेदाराला तुम्ही पुरस्कारासाठी निवडणार?

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२: क्रीडा विश्वातील कोणत्या शिलेदाराला तुम्ही पुरस्कारासाठी निवडणार?

googlenewsNext

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा कृतज्ञ सन्मान म्हणजे, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यंदाचं या पुरस्कारांचं आठवं पुष्प. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. 'क्रीडा' या श्रेणीत पाच खेळाडूंना नामांकन मिळालं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांना मत देण्यासाठीची लिंक खाली दिली आहे. तुमची मतं आणि मान्यवर ज्युरींनी दिलेले गुण याद्वारे पुरस्कार विजेत्याची निवड होईल. 

अवंतिका नराळे- धावपटू, पुणे

वडील प्लंबर, खंबीरपणे उभी असलेली आई, प्रशिक्षक नाही. आर्थिक बाजू कमकुवत, पण कठोर मेहनतीच्या जोरावर पुण्याची अवंतिका नराळे ऑलिम्पिक पदाचे स्वप्न घेऊन धावत आहे. हाँगकाँग येथे २००९ मध्ये युवा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत अवंतिकाने सुवर्ण जिंकले. १०० मी. शर्यतीत ती सर्वात वेगवान युवा आशियाई ठरली होती. याच स्पर्धेत २०० मी. शर्यतीत अवंतिकाला रौप्यवर समाधान मानावे लागले होते. कबड्डी अवंतिकाचे पहिलं प्रेम, परंतु प्रशिक्षक संजय पाटणकर यांनी तिला अॅथलेटिक्सचा सल्ला दिला. २०२१ मध्ये २० वर्षांखालील स्पर्धेतही तिने १०० मी. मध्ये सुवर्ण जिंकले. त्यानंतर २३ वर्षांखालील स्पर्धेतही तिने सुवर्ण कामगिरी कायम ठेवली. एप्रिल २०२२ मध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये १०० मी. मध्ये अवंतिकाने रौप्य पटकावले.

मत देण्यासाठीइथे क्लिक करा

मृण्मयी देशपांडे- बॅडमिंटन, सोलापूर

अतुल यानी लेगस्पिनर आणि फलंदाज म्हणून रणजी क्रिकेट गाजवले तर आई धनश्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या व्हॉलिबॉलपटू सुनील देवांग मृण्मयीने ठाणे येथे श्रीकात वाड यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटनचे धडे गिरवले. आता वरुण खानविलकर यांच्याकडे सराव सुरू आहे. २०१६-१७ पासून मृण्मयीने राज्य, राष्ट्रीय स्तरावर दहा स्पर्धा जिंकल्या. पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत ती उपविजेती ठरली. खेलो इंडिया गेम्समध्येही तिने छाप पाडली. नागपुरात इंडिया महाराष्ट्र इंटरनॅशनल चॅलेंज' स्पर्धेसह ऋतुराजला संघात कायम ठेवले. ऋतुराज पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चमकदार कामगिरीचा तिने निर्धार केला आहे.

मत देण्यासाठीइथे क्लिक करा

अनिकेत जाधव- फुटबॉल, कोल्हापूर

कोल्हापूर म्हणजे लाल मातीतला कुस्तीचा रांगडा खेळ, असे समीकरणच भारतीय क्रीडा क्षेत्रात बनले आहे. आजूबाजूला कुस्तीचे आखाडे असताना अनिकेत जाधवने आपल्या क्रीडा कारकिदीला किक मारली. २०१७ साली भारतात झालेल्या फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत अनिकेत चमकला. यानंतर अनिकेतने इंडियन ओरोस संघाद्वारे व्यावसायिक आयएसएलच्या पहिल्या सत्रात बॉलबॉय राहिल्यानंतर २०१९ मध्ये ओडिशा एफसीकडून याच स्पर्धेत अनिकेतने पदार्पण केले. यंदा इंग्लिश क्लब ब्लॅकबर्न रोव्हर्स संघाच्या तीन महिन्याच्या सराव शिबिरासाठी त्याची निवड झाली. यानंतर त्याची भारतीय संघात वर्णी लागली. बॉलबॉय राहिल्यानंतर २०१९ मध्ये ओडिशा एफसीकडून याच स्पर्धेत अनिकेतने पदार्पण केले. यंदा इंग्लिश क्लब ब्लॅकबर्न रोव्हर्स संघाच्या तीन महिन्याच्या सराव शिबिरासाठी त्याची निवड झाली.  

मत देण्यासाठीइथे क्लिक करा

ऋतुराज गायकवाड- क्रिकेटपटू, पुरंदर, पुणे

सासवडजवळील पारगाव मेमाणे या लहानशा गावातील क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड. आई-वडील दोघेही नोकरीला असल्याने ऋतुराज कुटुंबासह पिंपरीजवळ सांगवी येथे राहत आहे. तेराव्या वर्षी थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर अकादमीतून ऋतुराज चमकला. २०१६ १७ मध्ये महाराष्ट्र रणजी संघात स्थान मिळवले. विजय हजारे चषक, रणजी क्रिकेटपटू, पुरंदर, पुणे, स्पर्धेतील शानदार कामगिरीच्या जोरावर भारत अ, ब संघात निवड झाली. २०१९ च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्याची निवड केली. २०२१ च्या आयपीएलमध्ये त्याने पहिले शतक झळकावत त्याने सर्वाधिक ६३५ धावा केल्या. २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने सहा कोटी रुपये मोजून ऋतुराजला संघात कायम ठेवले. २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामन्यात पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले होते.

मत देण्यासाठीइथे क्लिक करा

दिव्या देशमुख- बुद्धिबळ, नागपूर

 

वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकून नागपूरच्या दिव्या देशमुखने ऐतिहासिक कामगिरी केली. ही स्पर्धा जिंकणारी ती नागपूरची पहिली खेळाडू ठरली. यासह दिव्या ही स्पर्धा जिकणारी एकूण चौथी किशोरवयीन खेळाडू ठरली, सर्वोच्च ग्रँडमास्टर नॉर्म दिव्याने वयाने अवघ्या १५व्या वर्षी मिळवले हे विशेष. ऑक्टोबर २०२१ मध्ये फर्स्ट सेटरडे ग्रँडमास्टर ठरली. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकून नागपूरच्या दिव्या देशमुखने ऐतिहासिक कामगिरी केली. ही स्पर्धा जिंकणारी ती नागपूरची पहिली खेळाडू ठरली. यासह दिव्या ही स्पर्धा जिकणारी एकूण चौथी किशोरवयीन खेळाडू ठरली, सर्वोच्च ग्रैंडमास्टर नॉर्म दिव्याने वयाने अवघ्या १५व्या वर्षी मिळवले है विशेष. ऑक्टोबर २०२१ बुद्धिबळ स्पर्धेत दिव्याने हा मान मिळवला. ती भारताची २१वी महिला ग्रैंडमास्टर ठरली. भारतीय महिलामध्ये १४ये मानांकन असलेली दिव्या विद्यमान राष्ट्रीय विजेती आहे. कोरोना महामारी दरम्यान २०२० मध्ये ऑनलाइन ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने रशियासह संयुक्तपणे जेतेपद पटकावले. या विजेतेपदामध्ये दिव्याचा खेळ मोलाचा ठरला. यंदा चेन्नईत ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये दिव्याने भारतीय व संघाचे नेतृत्वही केले.

मत देण्यासाठीइथे क्लिक करा

Web Title: Lokmat Maharashtrian of the Year 2022: Vote For The Sportsperson In Maharashra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.