शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

संकटकाळात रक्तदान अभियानाचा गरजूंना मोठा दिलासा मिळेल : राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 06:39 IST

लोकमत रक्तदान महायज्ञाच्या लोगोचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘रक्ताचं नातं’ या नावाने लोकमत मीडिया समूहाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी रक्तदान महायज्ञाच्या लोगोचे अनावरण सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनावर करण्यात आले. ‘लोकमत’च्या या अभियानाचे रक्ताची संभाव्य टंचाई दूर करण्यात मोठे योगदान राहील, असे सांगून महामहीम राज्यपालांनी मोहिमेला शुभेच्छा दिल्या. या अभियानामुळे प्रत्यक्ष रक्ताची गरज असलेल्यांना मोठा दिलासा मिळेल, असे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितले. 

लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर लोकमत ‘रक्ताचं नातं’ या रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून, त्याची घोषणा जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून सोमवारी करण्यात आली. कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात काही ठिकाणी रक्ताची टंचाई जाणवली, तर विषाणू संक्रमणाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नियमित शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर ही टंचाई तीव्र स्वरूप धारण करेल. आज ५० टक्के शस्त्रक्रिया सुरू आहेत. ज्यावेळी हे प्रमाण १०० टक्के होईल तेव्हा मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासेल. 

नागपूर लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्रा व लोकमत टाइम्सचे कार्यकारी संपादक एन. के. नायक यांनी सोमवारी राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन या अभियानाची माहिती दिली. कोश्यारी यांच्या हस्ते यावेळी लोगोचे अनावरण करण्यात आले. लोकमत रक्तदान महायज्ञाबाबत आनंद व्यक्त करून शुभेच्छा देताना कोश्यारी म्हणाले की, रक्तदानाबाबत लोक बऱ्यापैकी जागरूक असले तरी लोकमतसारख्या अत्यंंत लोकप्रिय व प्रतिष्ठित वृत्तपत्राकडून असे अभियान राबविण्यात आल्यामुळे प्रत्यक्ष रक्ताची गरज असलेल्यांना मोठा दिलासा मिळेल. कोश्यारी यांनी लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या सामाजिक, राजकीय योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.

रक्ताची मोठी गरजथॅलेसिमियासारख्या आजारातील रुग्णांना रक्ताशिवाय जगणे कठीण असते. आपल्याकडे या आजाराचे जवळपास १५ हजार रुग्ण आहेत. या सगळ्यांना असलेली रक्ताची गरज लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य खाते, वैद्यकीय शिक्षण विभाग, तसेच राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या सहकार्याने हे अभियान राबविण्यात येत आहे. 

२ जुलैपासून राज्यभर शिबिररक्तदाता दिनापासून रक्तदानासाठी इच्छुकांकडून डिजिटल प्रतिज्ञापत्रे भरून घेतली जातील. त्याचप्रमाणे व्हॉट्सॲप संदेश व अन्य मार्गानेही नावनोंदणी करता येईल. स्व. बाबूजींच्या जयंतीदिनी, २ जुलैपासून राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीLokmatलोकमत