शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लग्नातल्या उपस्थितीने आचारसंहितेचा भंग?

By प्रगती पाटील | Updated: April 2, 2024 09:27 IST

Code Of Conduct: अशावेळी निवडणुका लागल्या तर या नेत्यांना बोलवायचे का? त्यांच्या येण्याने आपल्यावर एखादा गुन्हा तर दाखल होणार नाही, ही भीती सर्वसामान्यांना निश्चित असते. नेत्यांना नाही बोलावलं तर ते दुखावणार आणि बोलावलं तर गुन्हा दाखल होणार, असे भन्नाट द्वंद्व लगीनघरात सुरू असते. 

- प्रगती जाधव-पाटील (वार्ताहर/ उपसंपादक, लोकमत, सातारा)आचारसंहिता लागल्यानंतर उमेदवार लग्नाला आले तर तो आचारसंहितेचा भंग होतो का?- राजेश शिखरे, बुलढाणानिवडणुकांचे पडघम वाजू लागले की, सर्वत्र त्याची लगबग अनुभवायला मिळते. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नेते आणि त्यांचे कार्यकर्ते वाट्टेल ते करायला तयार असतात. वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत आपल्याला कसे पाेहोचता येईल, त्यांच्या संपर्कात कसे राहाता येईल, त्यांना आपलेसे कसे करता येईल आणि त्या माध्यमातून मतांची बेगमी कशी करता येईल, याकडे त्यांचा कटाक्ष असतो.

वर्षभर कोणाच्या दृष्टीस न पडलेले कार्यकर्तही नेत्यांचे प्रतिनिधी म्हणून अनेक कार्यक्रमांमध्ये आघाडी घेऊन पुढे जात असल्याचे पाहायला मिळते. निवडणूक कालावधीत एखाद्याच्या घरी कोणाचा मृत्यू झाला, तरीही त्याच्याकडे जाऊन सांत्वन भेटीचा अलीकडे नवा प्रघात आहे. लोकांच्या दु:खद क्षणात त्यांचे सांत्वन करण्यासाठी जाणारे नेते लग्न, बारसे, मुंज अशा कार्यक्रमालाही हजेरी लावण्यासाठी सज्ज असतात. काही लग्नांच्या तारखा  अगदी दोन - चार महिने आधीच ठरलेल्या असतात. स्थानिक संपर्काचा भाग म्हणून काहींनी तर नेत्यांच्या उपलब्धतेवरही लग्नाचा मुहूर्त ठरविलेला असतो. 

अशावेळी निवडणुका लागल्या तर या नेत्यांना बोलवायचे का? त्यांच्या येण्याने आपल्यावर एखादा गुन्हा तर दाखल होणार नाही, ही भीती सर्वसामान्यांना निश्चित असते. नेत्यांना नाही बोलावलं तर ते दुखावणार आणि बोलावलं तर गुन्हा दाखल होणार, असे भन्नाट द्वंद्व लगीनघरात सुरू असते. 

यासंदर्भात कायदा आणि नियम नेमके काय सांगतात? - निवडणुकीच्या कालावधीत नेत्यांचे असे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाण्यामुळे आचारसंहितेचा भंग होत नाही. पण, अशा कार्यक्रमांमध्ये जाऊन नेत्यांनी भाषण केले आणि त्यातून मतदारांना काही आमिष दाखवले तर तो मात्र आचारसंहितेचा भंग होतो. घरगुती मंगल कार्यात सहभागी होणाऱ्या उमेदवाराने आपल्या पक्षाचा किंवा निवडणूक चिन्हाचा प्रचार करणे, उपस्थितांना आमिष दाखवणे किंवा राजकीय वक्तव्य करणे, हा आचारसंहितेचा भंग असतो. पण, उमेदवाराने अशा कार्यक्रमात येऊन शुभेच्छा देणे, हा आचारसंहिता भंगाचा प्रकार होत नाही. (सरकारी कार्यालयांशी संबंधित अडचणी / प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल पत्ता : asezaletar@gmail.com)

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग