शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 10:34 IST

Baramati loksabha election - बारामती मतदारसंघात यंदा सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत असून सुप्रिया सुळेंच्या बाजूने शरद पवारांसह संपूर्ण कुटुंब उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बारामती - Sharad Pawar Voting ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय. या टप्प्यातील बारामती मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. बारामतीत यंदा पवार कुटुंबातील सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात लढत होत आहे. सुनेत्रा पवार यांना महायुतीने तर सुप्रिया सुळेंना मविआकडून उमेदवारी मिळाली आहे. बारामतीची ही लढत शरद पवार आणि अजित पवारांच्या प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे या मतदारसंघात प्रत्येक मत मोलाचं बनलं आहे.

बारामतीच्या अटीतटीच्या लढाईत शरद पवारांनीही लेकीसाठी मुंबईतील मतदार यादीतून नाव वगळून बारामतीचे मतदार बनले आहेत. बारामतीतील गोविंद बाग येथे शरद पवार आणि कुटुंब वास्तव्यास असतात. यंदाच्या निवडणुकीत पवारांनी बारामतीत मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. माळेगावच्या जिल्हा परिषद शाळेत शरद पवारांसह कुटुंबाने मतदान केले. प्रतिभा पवार, सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे, मुलगी रेवती सुळे, मुलगा विजय सुळे यांनीही बारामतीत मतदानाचा हक्क बजावला. 

आतापर्यंत शरद पवारांसह इतर कुटुंबीय सदस्य मुंबईत मतदान करत होते. मुंबईतल्या महालक्ष्मी येथील वार्ड क्रमांक २१४ येथे शरद पवार, रेवती सुळे, सदानंद सुळे यांचा मतदार यादीत समावेश होता. मात्र यंदा हे सर्व बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी मतदान करणार आहेत. २०१९ पर्यंत शरद पवारांचं सिल्व्हर ओक निवासस्थान पत्ता असलेले मतदान कार्ड होते. त्यांनी आतापर्यंत निवडणुकीत मुंबईत मतदान केले आहे. आता पुन्हा ते बारामतीचे मतदार बनले आहेत. काही वर्षापूर्वी शरद पवारांनी बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी आपले मतदान कार्ड बारामतीतून मुंबईत बदलून घेतले होते आणि आता लेकीसाठी पुन्हा मुंबईतून बारामतीत गेले आहेत.

ही आहे पवार कुटुंबाच्या मतदानाची यादी

शरद पवारप्रतिभा पवारसदानंद सुळेरेवती सुळेविजय सुळेरणजित दिनकरराव पवारअभिजीत पवारप्रतापराव गोविंदराव पवारशांतिशिला वसंतराव पवारमिनाश्री माधवराव पवारभारती प्रतापराव पवारशुभांगी रणजित पवार 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारbaramati-pcबारामतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४MumbaiमुंबईVotingमतदान