शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा; दिंडोरीमध्ये माकपाने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 09:26 IST

दिंडोरीत शरद पवार गटाच्या वतीने भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली असून, ही जागा माकपाला हवी होती. 

नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर माकपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, ही जागा माकपाला सोडा अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा, असा इशाराच माकपाचे नेते डॉ. डी. एल. कराड आणि माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना दिला.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी २० एप्रिलला ओझर येथे माकप नेते डॉ. डी. एल. कराड आणि माजी आमदार जीवा पांडू गावित यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र माकपचे नेते ऐकण्यास तयार नसल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समोरच यासंदर्भात तोडगा काढण्याचे ठरले. दिंडोरीत शरद पवार गटाच्या वतीने भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली असून, ही जागा माकपाला हवी होती. 

विधानसभेत संधी देऊजयंत पाटील यांनी दिंडोरीतील जागेसंदर्भात तोडगा काढण्यासाठी विधानसभा निवडणुकीत माकपाला अधिक संधी देऊ असे सांगितले, मात्र आधी लोकसभेबाबत बोला, असा माकपाचा पवित्रा होता. अखेरीस शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई किंवा पुणे येथे बैठक घेऊ, असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :dindori-pcदिंडोरीSharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४