शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : दानवेंचा प्रचार करण्यास शिवसैनिकांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 16:49 IST

रावसाहेब दानवे यांच्याकडून शिवसैनिकांना सन्मान दिला जात नाही व विश्वासात घेतले जात नाही, तरी देखील त्यांना मदत का करायची असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला.

मुंबई - जालना लोकसभा मतदारसंघातील रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील वाद सोडवण्यात मुख्यमंत्री देवींद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना यश आले असली तरी, दानवेंना मतदारसंघातील शिवसैनिकांचा विरोध कायम आहे. पैठण येथे युतीबाबत शिवसेनेच्या बैठकीत दानवे शिवसैनिकांना विश्वासात घेत नसल्याचे सांगत शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली.जालना मतदारसंघातील पैठण तालुक्यातील शिवसैनिकांनी दानवे यांचा प्रचार करण्यास विरोध केला. सोमवारी पैठण येथे शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली जालना लोकसभा युतीबाबत शिवसेनेची बैठक ठेवण्यात आली होती. बैठकीत पैठण तालुक्यातील शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. रावसाहेब दानवे यांच्याकडून शिवसैनिकांना सन्मान दिला जात नाही व विश्वासात घेतले जात नाही, तरी देखील त्यांना मदत का करायची असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला.मागील पाच वर्षांत मतदारसंघात दानवेंनी शिवसेनेला सुरुंग लावण्याच्या प्रयत्न केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर रावसाहेब दानवे यांनी नेहमी खालच्या भाषेत टीका केली आहे. आता परत त्यांचाच प्रचार कसा करावा असा सवाल उपस्थित शिवसैनिकांनी केला. बैठकीतील विरोधाचा सूर लक्षात घेता आमदार भुमरेंनी शिवसैनिकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. लवकरच दानवे यांच्यासोबत आपण बैठक घेऊन, त्यांना याबाबत बोलू व पुढील निर्णय असे कार्यकर्त्यांना भुमरे यांनी सांगितले. त्यामुळे दानवे मतदारसंघातील शिवसैनिकांची मनधरणी कशी करणार, अशी चर्चा जालना मतदारसंघात सुरू आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shiv Senaशिवसेनाraosaheb danveरावसाहेब दानवे