शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
4
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
5
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
6
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
7
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
8
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
9
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
10
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
11
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
12
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
13
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
14
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
15
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
16
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
17
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

Lok Sabha Election 2019 : शरद पवार सेनेची गुजरातवर स्वारी !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 1:13 PM

दिल्लीत मराठा नेते म्हणून प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी गुजरातमधून 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. त्यामुळे गुजरात स्वारीसाठी शरद पवार सेना सज्ज झाल्याचे चित्र आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. अनेक पक्षांनी उमेदवार जाहीर केले असताना अनेक राज्यांत युती आणि आघाडीची बोलणी अजुनही अंतिम टप्प्यात आहे. अनेक जागांवरून तिढा सुटत नसल्याने काही पक्षांनी 'एकला चलो रे' ची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल होत नाही, तोपर्यंत जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होईल, यावर प्रश्नचिन्हच आहे. 

बिहार आणि दिल्लीत काँग्रेसचे मित्र पक्षासोबतचे चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप आटोपलेले नाही. गुजरातमधील स्थिती देखील यापेक्षा वेगळी नाही. दिल्लीत मराठा नेते म्हणून प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी गुजरातमधून 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. त्यामुळे गुजरात स्वारीसाठी शरद पवार सेना सज्ज झाल्याचे चित्र आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस इतिहासाची पुनरावृत्ती तर नाही करत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होते आहे. शरद पवार यांच्या या भूमिकेने ४०० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या गुजरात लुटीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी गुजरातची लूट केली होती.

याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची गुजरातमध्ये युती झाली नव्हती. त्यामुळे काँग्रेसला अनेक जागांवर पराभवाला समोरे जावे लागले होते. अनेक जागांवर काँग्रेसच्या पराभवातील फरकापेक्षा अधिक मते राष्ट्रवादीने घेतली होती. त्यामुळे स्वबळाचा नारा देणाऱ्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार की, राष्ट्रवादी पुन्हा एकदा स्वबळावर लढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस