शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन्ही जागांवर विजय मिळणार : राजु शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 16:40 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता काही तास शिल्लक राहिले आहेत. २३ रोजी काय निकाल लागणार याची धाकधुक उमेदवारांना लागली आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरवले आहे. दोन दिवसात निकाल हाती येणार असून, दोन्ही ठिकाणी आमचाच विजय होणार असल्याचा दावा खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात जमिनीवर जाऊन काम केले आहे. त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे. गतवेळच्या मताधिक्क्यांपेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून येईल, असेही शेट्टी म्हणाले. ते एका, वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता काही तास शिल्लक राहिले आहेत. २३ रोजी काय निकाल लागणार याची धाकधुक उमेदवारांना लागली आहे. दुसरीकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन्ही उमेदवार मताधिक्क्याने विजय होणार असल्याचा दावा शेट्टी यांनी केला आहे. मतदारांच्या मनात काय आहे, हे चांगले माहीत आहे. निकालाची वाट पाहत असून मनामध्ये कसल्याही प्रकारची धाकधुक असण्याची गरज नाही. असे राजू शेट्टी म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर सांगली मतदारसंघातून विशाल पाटील तर हातकणंगलेमधून राजू शेट्टी स्वतः रिंगणात होते.

खासदार शेट्टी एक्झिट पोल बाबत बोलताना म्हणाले की, सगळीकडे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. पण काही माध्यमांमध्ये असे वृत्त जाणीवपूर्वक पसरविले जातात, जेणेकरून सट्टेबाजांना सट्टा खेळायला सोपे जावे. सट्टा घेणारे मालामाल होतील, पण सट्टा खेळणारे बरबाद होतील. याशिवाय दुसरे काही होणार नसून जो निकाल आहे, तो तसाच लागेल असा विश्वास सुद्धा यावेळी शेट्टी यांनी व्यक्त केला

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालRaju Shettyराजू शेट्टीSangliसांगलीhatkanangle-pcहातकणंगले