शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'लिहून घ्या... महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होत नाही'- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 16:07 IST

आज रात्री विधानसभा बरखास्तीचा निर्णय होणार, हे वृत्त निराधार - देवेंद्र फडणवीस

नागपूर: महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय आज रात्री घेण्यात येईल आणि लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक होईल, अशी चर्चा आज सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरुन बरेच तर्कवितर्कही लढवले जाताहेत. परंतु, हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे म्हटलं. महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही हे लिहून घ्या, अशा शब्दांत त्यांनी या चर्चेवर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक घेतली जाईल, असे दावे गेल्या काही दिवसांपासून केले जात होते. विरोधी पक्षातील काही नेत्यांनी राज्यात मुदतपूर्व निवडणूक होणार असल्याची विधानं केली होती. महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय आज रात्री दिल्लीत होणाऱ्या उच्चस्तरीय समितीकडून घेतला जाईल, अशी जोरदार आज सकाळपासून सुरू होती. त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र होणार का, याबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र ही चर्चा संपूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होणार या चर्चेत तथ्य नसल्याचं फडणवीस म्हणाले. गेल्या 48 तासांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. गेल्या दोन दिवसात राज्याच्या कॅबिनेटनं निर्णयांचा धडाका लावला आहे. फडणवीस सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण जीआर काढले आहेत. याशिवाय सरकारकडून उद्धाटनं आणि भूमिपूजन कार्यक्रमांचं आयोजनदेखील केलं जात आहे. राज्यात अधिकचे ईव्हीएम आणण्यासाठीदेखील हालचाली सुरू आहेत. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यात मुदतपूर्व निवडणूक होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.विशेष म्हणजे विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी असाच दावा केला होता. 28 फेब्रुवारीला विधानसभेचं अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जातील, असं चव्हाण म्हणाले होते. यावेळी त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनादेखील दिल्या होत्या. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी चव्हाण यांचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं होतं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस