शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अब्दुल सत्तार यांच्या 'ऑफर'चा खोतकर यांच्याकडून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 17:38 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला युतीधर्म समजावून सांगितल्याचे अर्जुन खोतकर यांचे म्हणाले.

औरंगाबाद - जालना लोकसभा मतदार संघातील तिढा अखेर सुटला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटला आहे. हा तिढा सुटल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या ऑफर विषयी खुलासा केला.

एक वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खोतकर म्हणाले, आपण याआधी अनेकदा लोकसभा निवडणुकीत दानवे यांच्यासाठी काम केले आहे. यापुढेही काम करणार आहे. मी कडवट शिवसैनिक, दगाफटका करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला युतीधर्म समजावून सांगितला. माझ्यावर जी जबाबदारी पक्षाने टाकली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे खोतकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी खोतकर यांना सत्तार यांच्या भेटीविषयी विचारण्यात आले. त्यावेळी खोतकर म्हणाले, सत्तार माझे चांगले मित्र असून माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांच्याशी माझी मैत्री कायम राहिल. मी दुखावलेलो होतो. त्यांनी मैत्रीच्या नात्याने मला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. त्यामुळेच सत्तार यांनी आपण 'गुड न्यूज' देणार असल्याचे म्हटले होते, असा खुलासा देखील खोतकर यांनी केला आहे.

मागील अनेक दिवसांपासून खोतकर-दानवे यांच्या शीतयुद्धामुळे जालना लोकसभा मतदारसंघात नेमकं काय होणार याची चर्चा सुरू होती. अर्जुन खोतकर यांनी काँग्रेस नेत्यांच्याही भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अर्जुन खोतकर काँग्रेसमध्ये प्रवेश करुन निवडणूक लढवणार अशा चर्चा मतदारसंघात सुरू होत्या. मात्र खोतकर यांनी माघार घेतल्यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Arjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस