शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown: नगरकरांना इतर जिल्ह्यांत ‘नो एण्ट्री’; आणखी आठ गावांत लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 08:10 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत म्हणजे दहा दिवस लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे

अहमदनगर : कोरोना रुग्णांची संख्या दहापेक्षा जास्त झाल्याने जिल्ह्यातील आणखी आठ गावांमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे. त्यानुसार निघोजसह पारनेर तालुक्यातील चार गावे, नेवासा तालुक्यातील एक, संगमनेर तालुक्यातील तीन आणि शेवगाव तालुक्यातील एक अशा आठ गावांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात बंद झालेल्या गावांची संख्या आता ६८ झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत म्हणजे दहा दिवस लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. शाळा, धार्मिक स्थळांसह, दुकाने, वस्तू विक्री, सेवा बंद राहणार आहेत. नागरिकांनाही गावात येण्यास व बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहेत. याबाबत विभागीय आयुक्त आज येथे येत असून बैठक होणार आहे.

नगरकरांना इतर जिल्ह्यांत ‘नो एण्ट्री’कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ६८ गावे लॉकडाऊन केल्याची बातमी राज्यभर पसरली आहे. इतर जिल्ह्यांतील नागरिकही त्यांच्या नगर येथील नातेवाइकांना फोन करून माहिती घेत आहेत. नगर जिल्ह्यात आम्ही यावे की नाही, अशी विचारणाही केली जात आहे. नगर जिल्ह्यातील नागरिकांची नाशिकला येताना अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. असाच निर्णय औरंगाबाद महापालिका प्रशासनही घेणार आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस