शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

लॉकडाऊनमध्ये 33 लाख कृषी ग्राहकांनी बिल भरले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 03:12 IST

महावितरणचे तब्बल ३६ हजार कोटींचे बिल थकले

- विशाल शिर्केपिंपरी-चिंचवड :  टाळेबंदी (लॉकडाऊन) काळामध्ये राज्यातील ३३ लाख ५३ हजार कृषी ग्राहकांनी एकदाही वीजबिल भरले नाही. त्यांच्याकडे तब्बल ३५ हजार ७२६ कोटी रुपये थकीत आहेत. इतक्या रकमेची वसुली कशी करायची, असा प्रश्न महावितरणसमोर आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये टाळेबंदी जाहीर करण्यात आली. जून महिन्यानंतर टाळेबंदी हळूहळू शिथिल करण्यात आली. मात्र, या काळात महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढली. एप्रिल ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत कृषीसह घरगुती, औद्योगिक, वाणिज्य, पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा अशा ९८ लाख ५ हजार ग्राहकांनी एकदाही वीजबिल भरले नाही. ही रक्कम तब्बल ४७ हजार ४ कोटी इतकी आहे. त्यातील ३५ हजार ७२६ कोटी रुपये ३३ लाख ५३ हजार ४३४ ग्राहकांकडे आहेत, तर उर्वरित ११ हजार २७७ कोटी रुपये कृषी वगळून इतर ग्राहकांकडे आहेत.कृषी विभागातील सर्वाधिक १० लाख थकबाकीदार पुणे प्रादेशिक विभागातील आहेत. मात्र, सर्वाधिक थकबाकी औरंगाबाद आणि कोकण विभागात आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतीच पुणे प्रादेशिक विभागातील वीज वितरण हानी कमी करण्यासाठी कृषी पंपांसह संबंधित रोहित्रांचे सर्वेक्षण करून अनधिकृत वीज जोडण्या काढण्याचे आदेश प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. तसेच वाणिज्य, औद्योगिक वर्गवारीतील वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणने मोहीम सुरू केली आहे.वीज ग्राहकांना आवाहन ग्राहकांनी वीजबिल भरावे यासाठी महावितरणने मोहीम सुरू केली आहे. महावितरणने लॉकडाऊन काळात दरम्यान अखंडित वीजपुरवठ्यासाठी केलेले प्रयत्न लक्षात घेऊन ग्राहकांनी बिल भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.