शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

‘गुन्ह्यां’चा लोकलच्या वेळापत्रकाला फटका

By admin | Updated: July 8, 2016 01:38 IST

मुंबई उपनगरीय लोकलचे वेळापत्रक तांत्रिक बिघाडांनी जरी विस्कळीत होत असले तरी त्याला काही वेळा रेल्वे हद्दीतील ‘गुन्हे’देखील कारणीभूत ठरतात. रेल्वे हद्दीत होणाऱ्या अनेक

मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलचे वेळापत्रक तांत्रिक बिघाडांनी जरी विस्कळीत होत असले तरी त्याला काही वेळा रेल्वे हद्दीतील ‘गुन्हे’देखील कारणीभूत ठरतात. रेल्वे हद्दीत होणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या गुन्ह्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रकच तीन महिन्यांत बिघडले असल्याची बाब समोर आली आहे. विविध गुन्ह्यांमुळे एप्रिल ते जून या तीन महिन्यांत १00 लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. मागील वर्षाशी तुलना केल्यास त्याचे प्रमाण कमी झाले असून, रेल्वे सुरक्षा दलाने दाखविलेल्या तत्परतेमुळेच ही किमया साधण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलचा पसारा हा चर्चगेट ते डहाणूपर्यंत आहे. या मार्गावरून दररोज १,३00पेक्षा जास्त लोकल फेऱ्या होतात आणि ४0 लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मात्र या प्रवाशांना सातत्याने लोकल विस्कळीत होण्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या विस्कळीत होण्याला रेल्वे हद्दीतील गुन्हे हे प्रमुख कारण ठरत आहे. रेल्वे हद्दीत अनेक गुन्हे घडत असून, त्यातील काही गुन्ह्यांमुळे तर लोकलचे वेळापत्रक पुरते बिघडत आहे. प्रवाशांकडून लोकल किंवा मेल-एक्स्प्रेसमधील चेन ओढणे, ट्रेनमध्ये प्रवाशांमधील वाद, सिग्नल यंत्रणेशी निगडित असलेली बॅटरी किंवा केबल चोरी इत्यादी गुन्ह्यांचा समावेश वेळापत्रक विस्कळीत होण्यास कारणीभूत ठरत आहे. २0१६मधील एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ५४ केसेसची नोंद झाली आहे. यामुळे १00 फेऱ्या रद्द करतानाच जवळपास ४७८ लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागला आहे. वर्ष २0१५च्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांशी तुलना केल्यास आता रेल्वे हद्दीतील गुन्ह्यांचे आणि लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होण्याचे प्रमाण बरेचसे कमी झाले आहे. २0१५मध्ये ८१ घटनांची नोंद झाली असून, त्यामुळे ११६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर तब्बल ८२३ फेऱ्यांना उशीर झाला होता. त्यामुळे आता ४२ टक्के वक्तशीरपणात सुधारणा झाली आहे. (प्रतिनिधी)मागील वर्षातील एकट्या जून महिन्यात २४ केसेस दाखल झाल्या होत्या. तर त्यामुळे ५६ फेऱ्या रद्द करतानाच ३१९ फेऱ्यांना लेटमार्क लागला होता. 2016च्या जून महिन्यात फक्त १६ घटनांची नोंद झाली आहे. त्यामुळे ७७ फेऱ्या रद्द होतानाच २११ फेऱ्यांना लेटमार्क लागला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असून, लोकलच्या वक्तशीरपणातही सुधारणा झाली आहे. यापेक्षाही जास्त सुधारणा वेळापत्रकात होईल, याची खबरदारी आम्ही घेऊ. - आनंद झा (प.रे. सुरक्षा दल-वरिष्ठ सुरक्षा आयुक्त)