शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

लोकनेता अनंतात विलीन

By admin | Updated: June 5, 2014 02:00 IST

‘साहेब परत या, तुम्ही परत या’ अशी आर्त भावनिक साद घालणा:या आणि अश्रूंना वाट मोकळी करून देणा:या लाखो कार्यकत्र्यानी बुधवारी दुपारी गोपीनाथ मुंडे या लाडक्या नेत्याला अखेरचा सद्गदित निरोप दिला.

पंकजाचा धीरोदात्तपणा : फडणवीस, गडकरींविरुद्ध घोषणा, मंत्र्यांच्या गाडय़ा अडविल्या
प्रताप नलावडे - बीड 
‘साहेब परत या, तुम्ही परत या’ अशी आर्त भावनिक साद घालणा:या आणि अश्रूंना वाट मोकळी करून देणा:या लाखो कार्यकत्र्यानी बुधवारी दुपारी गोपीनाथ मुंडे या लाडक्या नेत्याला अखेरचा सद्गदित निरोप दिला. परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात राज्यभरातून आलेले त्यांचे कार्यकर्ते आणि चाहत्यांसह राज्यातील आणि केंद्रातील विविध पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
तिरंग्यात गुंडाळलेले पार्थिव फुलांनी सजविलेल्या चबुत:यावर ठेवल्यानंतर जवानांनी 21 फैरी हवेत झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली. केंद्रीय मंत्रिपदासाठी मुंडे यांना याच ठिकाणी मंगळवारी सत्काराचे हार घालण्याची योजना होती, पण त्याच परिसरात त्यांच्यावर चंदनाचे हार वाहण्याची वेळ त्यांच्या चाहत्यांवर आली़ हा काळजाला हात घालणारा प्रसंग रात्रीपासूनच देशभरातून आणि संपूर्ण राज्यातून लाखोंचा ‘नाथ’ साखर कारखाना परिसरात लोटलेल्या अगणित डोळ्यांनी पाहिला़ 
दुपारी 1 वाजून 47 मिनिटांनी मुंडे यांच्या पार्थिवाला आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी वैदिक मंत्रघोषात अगAी दिला. हवाईदलाच्या विशेष विमानाने मुंडे यांचे पार्थिव लातूरमार्गे परळीला आणले गेल़े हेलिपॅडपासून एक किलोमीटर अंतरावर अंत्यदर्शनासाठी खास फुलांनी सजविलेल्या चौथ:यावर पार्थिव ठेवण्यात आले. त्यावेळी त्यांच्या प}ी प्रज्ञा मुंडे, मुली पंकजा, प्रीतम आणि यशश्री तसेच विरोधी पक्षनेते विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस बरोबर होते.  
 लोक आक्रोश करीत होते. एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होते. आपला लाडका नेता आपल्यातून गेला यावर जणू ते विश्वास ठेवयालाच तयार नव्हते. गोपीनाथ मुंडे यांची छायाचित्रे उंचावत कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे अमर रहेच्या घोषणा देत 
होते. दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान पाच लाख लोकांपेक्षाही अधिक लोक कारखाना स्थळावर जमले होते. लोकांची गर्दी वाढत गेली तशी तेथे असलेली यंत्रणाही कोलमडून पडली. लोकांना आवरणो पोलिसांना अशक्य होऊन बसले. पार्थिव 
जेव्हा अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले, त्यावेळी तर लोकांनी व्हीआयपी शामियान्याकडे अक्षरश: धाव घेण्यास सुरूवात केली. 
लोकांना आवरण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला तेव्हा 
लोकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेकही केली़ यावेळी पंकजा पालवे यांनी माईक हातात घेतला आणि लोकांना शांत करण्याचा प्रय} केला. तुम्हाला साहेबांची शपथ आहे, तुम्ही शांत रहा, असे आवाहन केल्यानंतर दगडफेक थांबली. त्यानंतर दर्शनासाठी लोकांनी गर्दी केली. एक तास हे अंत्यदर्शन सुरू होते. त्यानंतर खासदार पूनम महाजन यांनी आता अंत्यसंस्कार सुरू होणार आहेत, असे सांगितले. भावूक झालेल्या कार्यकत्र्यानी मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करण्यास सुरूवात केली. अंत्यदर्शनासाठी जे नेते येत होते, त्यांच्याकडे पाहून कार्यकर्ते अशी मागणी करीत होते. याचवेळी नितीन गडकरी यांच्या विरोधातही घोषणाबाजी सुरू होती. 
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे आणि खासदार रामदास आठवले यांनी सीबीआय चौकशी करण्यात येईल, आणि यासंदर्भात आपण पंतप्रधानाशी बोलू असे उपस्थितांना सांगत त्यांना शांत करण्याचा प्रय} केला.  पण भावनातिरेकाने उद्दिपित झालेल्या चाहत्यांनी मंत्र्यांच्या गाडय़ाही रोखल्या़ 
 
 डझनभर मंत्री हेलिकॉप्टरने आले होते अंत्यविधीला
 मुंडे यांच्या अंत्यदर्शनासाठी बुधवारी परळीत केंद्रातील व राज्यातील अनेक मंत्री उपस्थित होत़े त्यांना घेऊन दिवसभरात 13 हेलिकॉप्टर आणि लष्कराचे एक विमान आले होते. यासाठी विशेष पंधरा हेलिपॅड तयार करण्यात आली होती़
 
 हेलिकॉप्टरने आलेल्या केंद्रातील मंत्र्यामध्ये गृहमंत्री राजनाथ सिंह, लालकृष्ण आडवाणी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा, तर राज्यातील मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हाण,आर. आर. पाटील, राजेंद्र दर्डा, नारायण राणो, छगन भुजबळ, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे  तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा समावेश होता. 
 
अंत्यविधी संपल्या नंतर परत मुंबईकडे परतणा:या मंत्र्यांना पोलिसांनी चोख बंदोबस्तात हेलिपॅडर्पयत पोहचविले. मुंबईला परत जाताना आर. आर. पाटील, छगन भुजबळ, राजेश टोपे, नारायण राणो, राजेंद्र दर्डा, राज ठाकरे, उध्दव ठाकरे, जितेंद्र आव्हाड आणि रावसाहेब दानवे हे सात नेते एकाच हेलिकॉप्टरमधून गेले.
 
शोकाकुल वातावरणात अंत्यदर्शनासाठी लागलेली अफाट रीघ, डोळ्यांमधून अखंड झरणारे अश्रू, आघात सहन न झाल्याने हंबरडा फोडणा:या महिला तसेच माझा गोपीनाथ कुठे गेला, असा आईच्या मायेने सुरू असलेला आक्रोश या माहोलाने परिसराला छावणीचे रूप देणा:या पोलिसांची मनेही हेलावली होती़ 
 
अंतर्गत रक्तस्नवाने गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू 
च्गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू अपघातानंतरच्या हृदयविकाराच्या झटक्याने नव्हे, तर मानेचा मणका आणि यकृताला जबर आघातानंतर झालेल्या अंतर्गत रक्तस्नवामुळे झाल्याचे एम्सच्या (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आह़े
च्एम्सच्या डॉक्टरांनी मुंडेंचा शवविच्छेदन अहवाल दिल्ली पोलिसांकडे सोपविला आहे. मुंडेंच्या पोटाला आणि मानेला अंतर्गत इजा झाली होती़ तसेच पाठीच्या कण्याचे मानेशी जोडलेले ‘सी 1’ आणि ‘सी 2’ हे मणके तुटून वेगळे झाले होत़े मानेच्या अन्य नसांसोबत सर्वात मोठी धमनी आणि मांसपेशींना जबर दुखापत झाली होती़ मानेला व यकृताला जबर इजा झाल्याने मुंडेंच्या शरीरात अंतर्गत रक्तस्नव झाला़ 
च्रक्तस्नवामुळे त्यांचे हृदय बंद पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असे या शवविच्छेदन 
अहवालात म्हटले आह़े हृदय बंद पडणो म्हणजे हृदयविकाराचा झटका नाही, असेही एम्सच्या 
डॉक्टरांनी स्पष्ट केले आह़े अंतर्गत रक्तस्रावामुळे त्यांच्या ओटीपोटात 5क्क् मिलिलिटर रक्त आणि रक्ताच्या गुठळ्या जमल्या होत्या़
 
लोकसभेची श्रद्धांजली
नवी दिल्ली : बुधवारपासून सुरू झालेल्या सोळाव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली़ श्रद्धांजलीनंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल़े हंगामी लोकसभाध्यक्ष कमलनाथ यांनी मुंडे यांच्या अकाली अपघाती निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव वाचून दाखवत त्यांच्या राजकीय व सामाजिक जीवनाचा परिचय करून दिला़ यानंतर सर्व सदस्यांनी दोन मिनिटांचे मौन पाळून मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली़