शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2023: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सध्या कोणाबरोबर आहेत तेच कळत नाहीय; राज यांची अमृता फडणवीसांनाच 'गुगली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 20:30 IST

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: अमृता फडणवीस यांनी राज यांना टाळी आणि डोळे मारण्यावरून प्रश्न विचारला. पुछता है महाराष्ट्र तुमचा काय प्लॅन आहे, असा प्रश्न अमृता यांनी विचारला. यावर राज यांच्या उत्तराने राज यांच्या पत्नी देखील खदखदून हसल्या.

आजच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यात राज ठाकरेंची मुलाखत अफलातून ठरली आहे. राज यांची राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. यावेळी अमृता यांच्या शिवसेना-भाजपा-राजकारण या प्रश्नांवर राज यांनी 'गुगली'लाच गुगली टाकत उत्तरे दिली. 

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत झाली. राज यांच्या उत्तरांनी अवघे पाहुणे हसून हसून लोटपोट झाले. 

अमृता फडणवीस यांनी राज यांना टाळी आणि डोळे मारण्यावरून प्रश्न विचारला. आजकाल राजकारणात टाळी देणे, डोळे मारणे चालू आहे. उदा. राहुल गांधींनी मोदींना मिठी मारली आणि डोळा मारला, अजित पवारांनी उद्धव ठाकरेंकडे माईक दिला आणि डोळा मारला, पुछता है महाराष्ट्र तुमचा काय प्लॅन आहे, असा प्रश्न अमृता यांनी विचारला. 

यावर राज ठाकरेंनी ''डोळे मारायचा?'' असा सवाल करताच सोहळ्यात एकच हशा पिकला. यावर हो आणि टाळी द्यायचा, दोन्ही असे अमृता फडणवीस म्हणाल्या. 

यावर राज ठाकरे यांनी काही सेकंद विचार करून अत्यंत चपखल उत्तर दिले. हे काय आहे, ज्या वयातल्या गोष्टी त्या वयात करायच्या असतात, त्यांच्या राहून गेल्या असतील कदाचित, असे उत्तर राज यांनी दिले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

अमृता यांनी मी राजकारणात सक्रीय नाही, न्यूज चॅनलवरून कळते की तुम्ही कधी राष्ट्रवादीच्या जवळ दिसता, कधी बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत दिसता तर कधी भाजपाला टाळी देता, तर हे कभी हा, कभी ना आता खूप पाहिलेय आता हे हम साथ साथ है हे केव्हा आणि कोणाबरोबर करणार, असा सवाल विचारला. 

यावर राज यांनी अमृता यांचा मुलाखतीच्या आधीचा मी देवेंद्र फडणवीसांची पत्नी म्हणून बोलणार नाहीयचा संदर्भ घेतला. तुम्ही देवेंद्रजींच्या पत्नी म्हणून बोलत नाही आहातच. त्यामुळे बोलुनच टाकतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सध्या कोणाबरोबर आहेत तेच कळत नाहीय, ते पहाटे कुठेतरी गाडी घेऊन जातात, तुम्हाला पत्ताच नसतो कित्येकदा. कधीतरी ते शिंदेंसोबत दिसतात, कधीतरी अजित पवारांचा पहाटे चेहरा उतरलेला दिसतो. कोणाला भेटणं, बोलणं हे पत्रकारांना सध्या बातमी झाली आहे. राजकारणातला मोकळेपणा मीडियाने घालवला आहे. कोणी कोणाला भेटले, बोलले यामुळे युत्या आणि आघाड्या होत नसतात. जोवर मूर्त स्वरुप येत नाही तोवर त्याला अर्थ नाही, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.  

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023Raj Thackerayराज ठाकरेAmruta Fadnavisअमृता फडणवीसLokmatलोकमत