शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2022: असह्य झालं, राजकीय करिअर धोक्यात आलं, अन् सहन करण्याची मर्यादाही संपली...; शिंदेंच्या भावनांना वाट मोकळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 06:31 IST

Lokmat Maharashtrian of the year awards 2022: ‘लोकमत’च्या महामुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनांना वाट मोकळी केली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सन २०१९ ला मिळालेला जनादेश डावलून आम्ही चूक केली. संधी अनेक वेळा आली होती. पण दुदैवाने ती आम्ही घेतली नाही. जेव्हा सगळेच असह्य झाले, पुढचे राजकीय करिअर धोक्यात आले, तेव्हा हा निर्णय घेतला. शेवटी काही गोष्टी सहन करण्याची मर्यादा असते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्याच्या महामुलाखतीत आपल्या भावनांना वाट करून दिली.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतली. या वेळी लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा देखील उपस्थित होते. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांतून वेगळी उत्तरे समोर आली.ज्या वेळी अनैसर्गिक गोष्टी घडतात त्या मनाला न  पटणाऱ्या असतात. मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे. पुढे काय होईल मला माहिती नाही. पण आता लढायचे आहे. लढून शहीद झालो तरी चालेल, पण लढाई लढायचीच, असा निर्णय घेऊन मी मोठे काम केले. आम्ही पक्षासाठी घाम गाळला. घरादाराची पर्वा केली नाही. मात्र, पक्षाचे अहित होत आहे, हे लक्षात आल्यानंतर पाच वेळा विनंती केली. जे सुरू आहे ते दुरुस्त करा, असे सांगितले. मात्र, ऐकायचेच नाही, असे त्यांनी ठरवले होते. आम्ही काही फार आनंदाने हा निर्णय घेतलेला नाही. भाजप आणि शिवसेनेला जनतेने कौल दिला होता. तो डावलून सरकार बनवण्याचा अट्टहास केला गेला. झालेली चूक आम्ही तीन महिन्यांपूर्वी दुरुस्त केली आहे.

कोविड असल्यामुळे चूक दुरुस्त व्हायला वेळ लागला. काही वेळ त्यांना समजावण्यात गेला. पण आम्हाला यश आले नाही. पण आम्ही लोकांच्या मतांचा आदरच केला आहे, असे सांगत शिंदे यांनी आपले मन मोकळे केले.

आमची किंमत तुमच्या भरवशावरमुलाखतीच्या सुरुवातीलाच नाना पाटेकर यांनी मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का? एकदा मत दिल्यानंतर पाच वर्षें आम्ही खिजगणतीतही नसतो. आम्ही तुम्हाला मत दिले आहे. प्रत्येकाने कोणाला तरी मत दिले असेल. तुम्ही जर काही केले नाही तर आम्ही काय करायचे? पाच वर्षानी आम्ही काय करायचे ते करू पण त्याच्या आधी आम्ही काय करायचे? याचे उत्तर तुमच्यापैकी कोणीही द्या, असा सवाल केला. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आमची किंमत तुमच्या भरवशावर आहे. तुमची किंमत कमी झाली तर आमची कशी राहील? तुमच्या मनातील आमची प्रतिमा खराब झाली तर तुम्ही आम्हाला कसे जवळ कराल, असे सांगितले.

पाच हजार बोगस शपथपत्रे मिळालीबाळासाहेबांची शिवसेना म्हणून आम्हाला नाव मिळाले आहे. शिंदे-बिंदे जाऊ द्या, बाळासाहेब महत्वाचे आहेत. ते निवडणूक आयोगाने मान्य केले आहे. मेरीटनुसार धनुष्यबाण आम्हालाच मिळाला पाहिजे. असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी कालपासून बघतोय आमच्यावर अन्याय झाला म्हणून कोणी गळे काढत आहे. मात्र, निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवले त्याला तेच जबाबदार आहेत. निवडणूक आयोगाने वारंवार कागदपत्रे सादर करण्याची संधी दिली होती. चार वेळा वेळही वाढवून दिली. आताच मला समजले की, त्यांना पाच हजार बोगस शपथपत्रे मिळाली. पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहेत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

जब मैं कमिटमेंट करता हूँ तो...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी जोरदार फटकेबाजी केली. एकदा मी जर कोणाला विश्वासाने शब्द दिला तर मी तो पूर्ण करतो. असे सांगून शिंदे यांनी सलमान स्टाइलमध्ये ‘जब मैं कमिटमेंट करता हूँ तो मैं खुद की भी नहीं सुनता...’ असे सांगताच सभागृहात हंशा पिकला.

समोर कोणती कंपनी आली...आता समोर कोणती कंपनी आली आहे, माहिती नाही. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नामोल्लेखही न करता मुख्यमंत्री शिंदे यांनी टोले लगावले. 

सरकार फेसबुकवर बनत नाहीसरकार फेसबुक लाइव्हवर बनवता येत नाही. त्यासाठी एकत्र यावे लागते आणि आम्ही तसे एकत्र आलाे व फिजिकल सरकार बनवले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. उद्धव ठाकरे सातत्याने फेसबुकवर लाइव्हवर यायचे. मंत्रालयातही ते फारसे आले नाहीत. त्याचा संदर्भ या बोलण्यामागे होता. त्यामुळे सभागृहात हंशा पिकला नाही तर नवल.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNana Patekarनाना पाटेकरlokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2022