शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Rally Supporting Sambhaji Bhide : प्रकाश आंबेडकरांना अटक करा, भिडे समर्थकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 12:39 IST

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ राज्यभरात बुधवारी सन्मान मोर्चे काढण्यात आले होते.

मुंबई/पुणे/सांगली - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ राज्यभरात बुधवारी सन्मान मोर्चे काढण्यात आले होते. कोरेगाव-भीमा हिंसाचार सहभागाचा ठपका ठेवत संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, संभाजी भिडे यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही, असा दावा करत त्यांच्या समर्थकांनी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले होते. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संभाजी भिडेंवर दाखल असलेले गुन्हे खोटे असून, ते मागे घ्यावेत, अशा घोषणा देत धारकरी रस्त्यावर उतरले होते.  

सांगलीत कडेकोट बंदोबस्तात मोर्चा निघाला तर पुण्यातील मोर्चामध्ये कोरेगाव-भीमा हिंसाचारात मृत्यू झालेल्या राहुल फंटागळेची आईदेखील सहभागी झाली होती. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

व्हिडीओ : राहुल फंटागळेच्या आईचा आक्रोश

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या या होत्या मागण्या 1. संभाजी भिडेंवरील खोटे गुन्हे सरकारने तत्काळ मागे घ्यावेत.2. मिलिंद एकबोटे, धनंजय देसाई यांची खोट्या आरोपातून मुक्तता करावी.3. पुण्यातील एल्गार परिषदेतील सर्व जातीयवादी वक्त्यांवर कारवाई करावी 4. कोरेगाव-भीमा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगळेला न्याय मिळावा.5. 3 जानेवारी 2018 ला करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई बंद पुकारणाऱ्यांकडूनच करावी.6. हिंसाचारामागे नक्षली हात आहे का?, यावर चौकशी समिती नेमावी

या ठिकाणी करण्यात आले होते मोर्चांचे आयोजन 

- सांगलीराजमतीभवन नेमिनाथनगर तें जिल्हाधिकारी कार्यालय

- कोल्हापूरबिंदू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय

- सोलापूरचार पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय

- साताराराजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय

- पुणेलालमहाल ते जिल्हाधिकारी कार्यालय

- मुंबईआझाद मैदान

- यवतमाळबसस्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालय

- जळगावशिवतीर्थ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय

- बेळगावश्रीसंभाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय

- नाशिकअनंत कान्हेरे मैदान तें जिल्हाधिकारी कार्यालय

- गोंदियाश्रीशिवप्रतिष्ठान जिल्हा कार्यालय तें जिल्हाधिकारी कार्यालय

- महाड दुर्गदुर्गेश्वर रायगडछत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांत कार्यालय महाड  

- सिंधुदुर्ग ओरस गाव ते जिल्हाधिकारी कार्यालय 

UPDATES - 

- संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ मोर्चा, पुण्यातील मोर्चाची सांगता

  • 11:51 AM पुणे : संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्च्यातील लोकांनी अॅम्ब्युलन्सला वाट देत संवेदनशीलतेचे दर्शन घडवले.

  • 11:49 AM पुणे :कोरेगाव भीमा प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगरे यांची आई जनाबाई फटांगरे यांनी बोलताना राहुलच्या मृत्यूला दोषी असणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली.

पुणे : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ मोर्चा. ओंकारेश्वर मंदिराजवळील नदीपात्रात आंदोलनास सुरुवात

 

 

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी